कमालच केली राव! पहिल्या रात्री बायको बघत होती वाट; अन् हा पठ्ठ्या बसला काम करत, लोक म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 13:05 IST2021-02-11T12:58:15+5:302021-02-11T13:05:24+5:30

Trending Viral news in Marathi : अनेकजण (Work From home) घरून काम करत असतानाही घरच्यांनाही वेळ देऊ शकत  नाही असं पाहायला मिळालं

Viral news in Marathi : Viral pic man was using computer while bride was waiting for him | कमालच केली राव! पहिल्या रात्री बायको बघत होती वाट; अन् हा पठ्ठ्या बसला काम करत, लोक म्हणाले....

कमालच केली राव! पहिल्या रात्री बायको बघत होती वाट; अन् हा पठ्ठ्या बसला काम करत, लोक म्हणाले....

कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर जास्तीत जास्त लोकांनी घरून काम करण्याचा पर्याय निवडला.  लॉकडाऊन हळू हळू उठवण्यात आला तरिही वर्क फॉर्म होम मात्र अनेक ठिकाणी सुरू आहे. सध्याच्या काळात लहान मुलांनाही फोन  वापरण्याचं एक नवीन कारण  मिळालं आहे.  स्मार्ट फोनच्या वापरामुळे मुलांचे इतर ठिकाणी लक्ष नसल्यानं अनेक पालकांनी शाळेत तक्रारी सुद्धा केल्या आहेत. त्यानंतर शिक्षकांनी फक्त अभ्यासासाठीच मोबाईलचा वापर करा असं अनेकांना बजावलं असेल. अनेकजण घरून काम (Work From home) करत असतानाही घरच्यांनाही वेळ देऊ शकत  नाही असं पाहायला मिळालं.

सध्या  सोशल मीडियावर एका नवविवाहीत  जोडप्याचा फोटो व्हायरल होत आहे. या दोघांचेही नुकतंच लग्न झालं आहे आणि लग्नाच्या कपड्यातच नवरी नवऱ्याची वाट पाहात बसली आहे. पण नवऱ्यामुलाला त्याचं काहीही पडलेलं नाही. तो माणूस कंप्यूटरवर बसून आपलं काम करताना दिसून येत आहे.  इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार हा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. शाब्बास! १२ वर्षांच्या चिमुरड्यानं शेअर बाजारात लावला पैसा; वर्षभरातच झाला ४३ टक्के फायदा, जाणून घ्या कसा  

या जोडप्याचं लग्न झाल्यानंतर एका खोलीत नवरी बेडवर बसून नवऱ्याची वाट पाहात आहे. पण तो मात्र कंम्प्यूटरवर आपलं काम करण्यात मग्न आहे. हा फोटो कुठे काढण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही.  या  फोटोतून सध्याच्या जीवनातील वास्तव दिसून येत आहे. लोकांनी या फोटोंवर गमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी या  फोटोतील जोडप्याची खिल्ली उडवली आहे.  अरे देवा!  हेअर स्प्रे संपला म्हणून या बाईनं डोक्याला ग्लू लावला; अन् मग झाली 'अशी' अवस्था...

Web Title: Viral news in Marathi : Viral pic man was using computer while bride was waiting for him