शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

१ नंबर जोडपं! व्हायरल झालेल्या 'Baba Ka Dhaba' च्या रडणाऱ्या आजोबांची लव्हस्टोरी माहित्येय का?

By manali.bagul | Published: October 14, 2020 2:13 PM

Viral love story of baba ka dhaba: सोशल मीडियाची कमाल तुम्ही बाबा का ढाबा या घटनेच्यावेळी पाहिली असेल. 

(Image Credit- officialHumansofbombay, Instagram)

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. अनेकदा या व्हायरल झालेल्या पोस्ट्समधून समाजातील लोकांच्या समस्या, गंभीर प्रश्न जगासमोर येतात. सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त होतात. अनेकदा मदतीचा हात पुढे केला जातो. हाच मदतीचा हात गरजू घटकांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. सोशल मीडियाची कमाल तुम्ही बाबा का ढाबा या घटनेच्यावेळी पाहिलीच असेल. 

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये 'बाबा का ढाबा' नावाने जेवणाचे पदार्थ बनवून हे बाबा एक छोटसं दुकान चालवतात. या आजोबांचे नाव कांताप्रसाद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे वृद्ध दाम्पत्य आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अन्नपदार्थ विकून पैसे मिळवत होते. पण लॉकडाऊन झालं आणि त्यांची कमाई पूर्ण बंद झाली. अशातच एक यूट्यूबर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना या आजोबांना रडू कोसळले आणि बघता बघता व्हिडीओ व्हायरल झाला. 80 वर्षीय जोडप्याला मदत करण्यासाठी लोकांनी ढाब्यावर गर्दी केली. जे लोक ढाब्यावर जाऊ शकत नव्हते त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून या वृद्ध दाम्पत्याला मदतीचा हात दिला.

झोमॅटोवरही आता बाबा का ढाबा लिस्टेड आहे. सध्या  या आजोबांची लव्ह स्टोरी तुफान व्हायरल होत आहे. ह्यूमन्स ऑफ बॉम्बे या पेजवर नेहमीच लोकांच्या प्रेरणादायी कहाण्या शेअर केल्या जाता. आता  कांदाप्रसाद या आजोबांच्या लव्हस्टोरीबद्दलही माहिती दिली आहे.

अशी सुरू झाली लव्हस्टोरी

या आजोबांच्या पत्नीचे नाव बदामी आहे. विशेष म्हणजे लहानपणीच या दोघांचं लग्न घरच्या मंडळींकडून ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी कांदाप्रसाद हे ५ वर्षांचे असून बदामी या ३ वर्षाच्या होत्या. उत्तरप्रदेशातील आजमगड या ठिकाणी  या दोघाचे लग्न झाले. आजोबांनी सांगितले की, ''आमच्या सोबत जे झालं ते आमच्या मुलांसोबत होऊ नये असं आम्हाला वाटत होतं. म्हणून आम्ही उत्तर प्रदेश सोडण्याचा निर्णय घेतला. १९६१ मध्ये आम्ही दिल्लीला आलो. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा बदामी एका बाहुलीप्रमाणे दिसत होती. '' अरे बाप रे बाप! शेतकऱ्याने पिकवली तब्बल १७ किलो वजनाची एक कोबी, आकार पाहून सगळेच हैराण...

पुढे त्यांनी सांगितले की, ''दिल्लीला आल्यानंतर मी सगळ्यात फळं विकण्याचे काम सुरू केले. मला असं वाटतं माझी पत्नी बेस्ट सेल्स वुमन आहे. कारण ग्राहकांशी चांगला व्यवहार करून आपल्या फळांची विक्री करणं तिला मस्त जमतं. त्यानंतर आजोबांनी चहाची टपरी उघडली. तेव्हा माझी पत्नी म्हणाली, ''जर चहाचं दुकान चाललं नाही तर  आपण काहीतरी वेगळं काम करू''. १९९० मध्ये आम्ही बाबा का ढाबा उघडला. आम्ही दोघं मिळून हे काम करतो. लॉकडाऊनच्या आधीही अनेक संकटांचा सामना  करावा लागला होता. पण आम्ही कधीही एकमेकांची साथ सोडली नाही.'' सलाम! रोज हजारो लोकांना फक्त १ रुपयात पोटभर जेवण पुरवतोय हा 'देवमाणूस'...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप