Viral News in Marathi: A man open tea stall named kalu bewafa chai wala in gwalior | 'कालू बेवफा चाय वाला'; आता प्रेमात धोका मिळालेल्यांना इथं मिळणार खास चहा!

'कालू बेवफा चाय वाला'; आता प्रेमात धोका मिळालेल्यांना इथं मिळणार खास चहा!

आनंदात असो किंवा दुःखात कोणत्याही स्थितीत चहाप्रेमींना चहा हवाच असतो. घरातून बाहेर पडल्यानंतर  प्रत्येक कोपऱ्यावर चहाची टपरी किंवा एखादे अमृततुल्य चहाचे दुकान असतेच. आपला चहा खास असावा यासाठी चहाविक्रेते नेहमीच प्रयत्न करत असतात. प्रत्येक विक्रेत्याच्या चहाची एक वेगळी खासियत असते. 
सोशल मीडियावर सध्या एक आगळा वेगळा चहावावाला व्हायरल होत आहे. हे चहाचं दुकान  ग्वाल्हेरला असल्याचे सांगितले जात आहे.

या चहा विक्रेत्याच्या दुकानात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचा आस्वाद घेता येईल. खासकरून प्रेमभंग झालेल्यांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चहा मिळत आहेत. ग्राहकांच्या मनस्थितीचा विचार करता या चहावाल्याने अनोखी शक्कल लढवली आहे.  इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कालू बेवफा (kalu bewafa chai) चहावाल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चहाच्या प्रकाराचा एक तक्ता तयार केला आहे.

जिंकलंस पोरी! आई-वडिलांनी केली लष्करात देशसेवा तर लेक रात्रंदिवस मेहनत करून IAS बनली

चहाच्या प्रकारानुसार किमतीतही बदल दिसून येत आहे. प्रेमात धोका मिळणं चहाची किंमत  ५ रुपये आहे. तर प्रेमी जोडप्याच्या स्पेशल चहाची किंमत  १५ रुपये आहे. नवीनच रिलेशनशिपमध्ये आलेल्या प्रेमींच्या चहाची किंमत १० रुपये आहे. एकटेपणा चहाची किंमत २० रूपये आहे. 

अभिमानास्पद! बीएमसीच्या शाळेतली अन् चाळीतल्या घरात वाढलेली सुवर्णा; आता ‘नासा’ची कर्मचारी

विशेष म्हणजे या चहाच्या दुकानात ऑफरसुद्धा मिळत आहे. कालू बेवफा चहावाल्याच्या दुकानात पत्नीपिडीत म्हणजेच पत्नीच्या त्रासाने ग्रासलेल्यांना मोफत चहा दिला जाणार आहे.  याशिवाय पती पत्नी एकत्र या चहाच्या दुकानात आल्यानंतर या दुकानात डेमोवाली चहा मोफत देण्यात येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Viral News in Marathi: A man open tea stall named kalu bewafa chai wala in gwalior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.