Firefighter saved man 15000 bees : कार लावून किराण्यात सामान आणायला गेला; अर्धवट उघड्या खिडकीतून १५०० मधमाश्या आत शिरल्या; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 02:29 PM2021-04-01T14:29:08+5:302021-04-01T14:34:55+5:30

Viral News in Marathi Firefighter saved man 15000 bees : एकाचवेळी एवढ्या मधमाश्या पाहून न कोणाचीही शुद्ध हरपेल.

Viral News : This is how firefighter saved man from 15000 bees | Firefighter saved man 15000 bees : कार लावून किराण्यात सामान आणायला गेला; अर्धवट उघड्या खिडकीतून १५०० मधमाश्या आत शिरल्या; अन् मग...

Firefighter saved man 15000 bees : कार लावून किराण्यात सामान आणायला गेला; अर्धवट उघड्या खिडकीतून १५०० मधमाश्या आत शिरल्या; अन् मग...

Next

मधमाशी चावल्यानंतर काय होतं, याची तुम्हाला चांगलीच कल्पना असेल.  कोणत्याही व्यक्तीला मधमाशीनं दंश केल्यास तीव्रतेनं वेदना जाणवतात. समजा एखाद्या ठिकाणी मधमाश्यांचे पोळं फुटलं तर त्या माणसांना सळो की पळो करून सोडतात. अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारमध्ये बसलेल्या एका माणसाला मधमाश्यांनी घेरलं आहे. एकाचवेळी एवढ्या मधमाश्या पाहून न कोणाचीही शुद्ध  हरपेल.

ही घटना घडल्यानंतर बचाव पथकाच्या जवानांनी मधमांश्यांना बाहेर काढण्याच प्रयत्न केला. या माणसालाही मधमाश्यांनी घेरलं आणि  चावण्याचा प्रयत्न करत होत्या. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारवर मधमाश्यांनी हल्ला चढवला होता. समोर आलेल्या माहितीनुसार मधमाश्याचे पोळे फुटल्यामुळे बचाव पथकाच्या जवानांवरही आक्रमण  केलं आणि कारला सगळ्या बाजूंनी घेरलं.

हा माणूस किराणा दुकानात सामान घ्यायला  गेला होता. त्यावेळी कारची खिडकी उघडी राहिल्यामुळे मधमाश्या आत शिरल्या. जेव्हा हा माणूस परत आला तेव्हा १५ हजार मधमाश्यांनी या माणसाला आणि त्याच्या कारला  घेरलं होतं. त्यानंतर कार मालकानं मदतीसाठी लॉस क्रॉसेस फायर डिपार्टमेंटला फोन केला.

टाके मारल्यापासून छातीत दुखायचं; कंटाळून पुन्हा डॉक्टरकडे गेला अन् X-Ray रिपोर्टमध्ये दिसलं असं काही....

फेसबुक पोस्टवर नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार अग्निशमन विभागानं लिहिले की, ऑफ ड्यूटी फायर फायटर जेसी जॉनसननं हे काम पार पाडण्याची जबाबदार घेतली. मधमाश्यांना कारच्या बाहेर काढण्याआधी त्यांनी आजूबाजूच्या लोकांना सुरक्षित जागेवर जाण्यास सांगितलं. कारण कोणत्याही क्षणी मधमाश्यांनी त्यांच्यावर  हल्ला चढवला असता. 

तब्बल ३० वर्षांनंतर महिलेनं उघडलं तोंड; या एका आजारामुळे फक्त द्रव पदार्थांवर होती जीवंत

जॉनसन यांनी संपूर्ण सुरक्षितता आणि सामानांसह घटनास्थळी परिस्थिती हाताळली.  जेव्हा त्यांनी कारमधून मशमाश्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला  तेव्हा त्यांच्यावरही मधमाश्यांनी हल्ला केला पण त्यावेळी  कीट  घातलेलं असल्यामुळे कोणतंही नुकसान पोहोचलं नाही. शेवटी मधमाश्यांना बाहेर काढण्यात या माणसाला  यशं आलं. त्यानंतर कार चालक आपली कार घेऊन निघाला. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Web Title: Viral News : This is how firefighter saved man from 15000 bees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.