हृदयद्रावक! काम करायला नकार दिल्यानं ८२ वर्षीय सासूला मारहाण; सुनेनं घराबाहेर हाकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 20:12 IST2020-08-24T20:03:18+5:302020-08-24T20:12:03+5:30

वय जास्त असल्याने मारहाण केलेल्या महिलेला चालण्याचाही त्रास होत होता.  मारहाण केल्यानंतर या वृद्ध महिलेची सुन फरार आहे. 

Viral News daughter in law beaten mother haryana | हृदयद्रावक! काम करायला नकार दिल्यानं ८२ वर्षीय सासूला मारहाण; सुनेनं घराबाहेर हाकललं

हृदयद्रावक! काम करायला नकार दिल्यानं ८२ वर्षीय सासूला मारहाण; सुनेनं घराबाहेर हाकललं

कोरोनाकाळात माणूसकीचं दर्शन अनेकांना घडलं.  दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं सर्वत्र खळखळ उडाली आहे. घरातील वयोवृद्ध सासूने काम करण्यास नकार दिल्यामुळे सुनेनं चक्क मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरियाणातील सोनिपत परिसरात सेक्टर २३ मध्ये ही घटना घडली आहे. 

हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होत आहे. मारहाण करत असलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ दोन्ही नातवंडानी तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. वय जास्त असल्याने मारहाण केलेल्या महिलेला चालण्याचाही त्रास होत होता.  मारहाण केल्यानंतर या वृद्ध महिलेची सुन फरार आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलानंही पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या सूनेवर सासूला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांकडून फरार महिलेचा शोध घेतला जात आहे. हा घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.

हे पण वाचा-

अरे व्वा! लोकांनी टाकून दिलेल्या मास्कपासून लाखो रुपयांच्या वीटा तयार करतो 'हा' अवलिया

याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान

सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

Web Title: Viral News daughter in law beaten mother haryana