जे निकामी सिम कार्ड आपण फेकतो त्यातून एकाने काढलं ३१ लाख रूपयांचं सोनं, वैज्ञानिक सांगतात दावा खरा की खोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 15:10 IST2026-01-31T15:04:47+5:302026-01-31T15:10:15+5:30

Viral News : एका ब्लॉगरने हजारो जुने सिम कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून शुद्ध सोनं काढल्याचा दावा केला असून त्याची किंमत ३१ लाख रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलंय.

Viral : Chinese man extracts over $30,000 worth of gold from scrap SIM cards | जे निकामी सिम कार्ड आपण फेकतो त्यातून एकाने काढलं ३१ लाख रूपयांचं सोनं, वैज्ञानिक सांगतात दावा खरा की खोटा

जे निकामी सिम कार्ड आपण फेकतो त्यातून एकाने काढलं ३१ लाख रूपयांचं सोनं, वैज्ञानिक सांगतात दावा खरा की खोटा

Viral News : मोबाईलमधील जुनं सिम कार्ड बदललं की, सामान्यपणे कुणीही ते कचऱ्यात टाकतात. इतरही अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू अनेकदा कचऱ्यात टाकल्या जातात. मात्र हाच ई-वेस्ट म्हणजेच डिजिटल कचरा लाखोंच्या कमाईचे साधन ठरू शकतो, असा धक्कादायक दावा अलीकडे समोर आला आहे. चीनमधील एका ब्लॉगरने हजारो जुने सिम कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून शुद्ध सोनं काढल्याचा दावा केला असून त्याची किंमत ३१ लाख रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलंय.

सिम कार्डमधून १९१ ग्रॅम सोनं काढल्याचा दावा

ब्लॉगरने सांगितलं की त्यानं हजारो निकामी सिम कार्ड आणि कम्युनिकेशन चिप्स रिफाइन करून १९१.७३ ग्रॅम शुद्ध सोनं मिळवलं. हे सोनं २४ कॅरेट मानलं तर त्याची किंमत सुमारे ३१ लाख रुपये होते. व्हिडीओमध्ये इलेक्ट्रॉनिक कचरा वेगवेगळ्या टप्प्यांत प्रक्रिया करताना दाखवण्यात आला असून, त्यामुळे इंटरनेटवर मोठी खळबळ उडाली.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओमध्ये सोनं काढण्यासाठी आम्ल, रसायनं आणि वीज यांसारख्या धोकादायक पद्धती वापरल्याचं स्पष्ट दिसतं. सिम कार्डांचे छोटे तुकडे करून ते आम्लात टाकण्यात आले आणि नंतर धातू वेगळी करण्यात आली. व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी याला भन्नाट कल्पना म्हटलं, तर काहींनी नोकरी सोडून भंगार गोळा करणं फायद्याचं असल्याची उपरोधिक कमेंट केली.

तज्ज्ञांचा इशारा

वाद वाढल्यानंतर तज्ज्ञांनी या दाव्याबाबत स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या मते, सामान्य सिम कार्डमध्ये सोन्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं. साधारण १९१ ग्रॅम सोनें मिळवण्यासाठी जवळपास ४ लाख सिम कार्डांची आवश्यकता भासते.

यानंतर ब्लॉगरनेही कबूल केलं की त्याने केवळ सामान्य सिम कार्ड नव्हे, तर टेलिकॉम क्षेत्रातील खास इलेक्ट्रॉनिक कचरा वापरला होता, ज्यावर सोन्याचा जाड लेप असतो. तज्ज्ञांनी स्पष्ट इशारा दिला की योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षा साधनांशिवाय घरच्या घरी असे प्रयोग करणे जीवघेणे ठरू शकते.

Web Title : क्या बेकार सिम कार्ड से सोना? दावे पर विवाद, विशेषज्ञों की चेतावनी

Web Summary : एक ब्लॉगर ने बेकार सिम कार्ड से ₹31 लाख का सोना निकालने का दावा किया, जिससे विवाद छिड़ गया। विशेषज्ञों ने चेतावनी दी कि सामान्य सिम कार्ड में बहुत कम सोना होता है। ब्लॉगर ने विशेष दूरसंचार कचरे का उपयोग करने की बात कही, लेकिन सुरक्षा के बिना खतरनाक DIY निष्कर्षण प्रयासों के खिलाफ चेतावनी दी।

Web Title : Discarded SIM Cards Yield Gold? Claim Sparks Debate, Experts Caution

Web Summary : A blogger claimed extracting gold worth ₹31 lakhs from discarded SIM cards, sparking debate. Experts warn that ordinary SIM cards contain minimal gold. The blogger clarified using specialized telecom waste, but cautioned against dangerous DIY extraction attempts without proper safety.