Video : लग्नात महिलेने केला असा काही खतरनाक डान्स, व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 18:20 IST2021-12-25T18:17:26+5:302021-12-25T18:20:34+5:30
Viral Video : इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एका पार्टीत काही लोक ग्रुप डान्स करताना दिसत आहेत. तेव्हा अचानक बॉलिवूड स्टार हृतिक रोशनचं 'बॅंग बॅंग' गाणं लागतं.

Video : लग्नात महिलेने केला असा काही खतरनाक डान्स, व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ
लग्नातील असे अनेक व्हिडीओ आपणं पाहतो, ज्यात वराती आपल्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतात. वरातीत कुणी नागिन डान्स तर कुणी जमिनीवर लोळून डान्स करतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) नेहमीच व्हायरल होतात. असाच एका महिलेचा लग्नातील डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. महिलेचा हा डान्स पाहून लोक हैराण झाले आहेत.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एका पार्टीत काही लोक ग्रुप डान्स करताना दिसत आहेत. तेव्हा अचानक बॉलिवूड स्टार हृतिक रोशनचं 'बॅंग बॅंग' गाणं लागतं. जे ऐकून सगळेच आणखी जोशाने डान्स करू लागतात. तेव्हा या ग्रुपमधील महिला सर्वांना सरप्राइज देते. ती जमिनीवर बसते आणि डान्स करू लागते. हे पाहून सोबतचे लोकही हैराण होतात.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 69Flix नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत १८ हजार लोकांनी लाइक केलंय. तर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच नाही तर यूजर्स या व्हिडीओवर भरभरून कमेंट्सही करत आहेत. लोक महिलेचा डान्स पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत.