Video: मुंबई लोकलमध्ये हा काय प्रकार? बुरखा घालून महिलांच्या डब्ब्यात चढला, राडा झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 10:50 IST2026-02-08T10:48:23+5:302026-02-08T10:50:00+5:30

मुंबई लोकलमध्ये दररोज कुठल्या ना कुठल्या घटना घडत असतात. पण, एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक पुरुष बुरखा घालून महिलांच्या डब्ब्यात घुसला. काही महिलांच्या नजरेस ही बाब आली. त्यानंतर तो उडी मारून फरार झाला. 

Video: What is this like in Mumbai local? Wearing a burqa, he boarded the women's compartment, there was a ruckus | Video: मुंबई लोकलमध्ये हा काय प्रकार? बुरखा घालून महिलांच्या डब्ब्यात चढला, राडा झाला

Video: मुंबई लोकलमध्ये हा काय प्रकार? बुरखा घालून महिलांच्या डब्ब्यात चढला, राडा झाला

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलरेल्वेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. एक पुरुष बुरखा घालून महिलांच्या डब्ब्यात शिरला. तो महिलांना स्पर्श करू लागला. ही बाब काही महिलांच्या नजरेस पडली. त्यांनी लगेच त्याला पकडले आणि जाब विचारला. सगळ्या महिलांनी घेरल्यानंतर तो रेल्वेतून उडी मारून फरार झाला. 

सोशल मीडियाववर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकावर हा माणूस बुरखा घालून महिलांच्या डब्ब्यात चढला होता. महिलांना तो स्पर्श करू लागला. बुरखा घातलेली महिला नसून, पुरुष असल्याची बाब काही महिलांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्याला पकडले आणि जाब विचारला.

रेल्वेतूनच मारली उडी

महिलांच्या डब्ब्यात बुरखा घालून घुसलेल्या या माणसाला महिलांनी जाब विचारला. सगळ्या महिला त्याच्याजवळ आल्यानंतर त्याने घाईतच रेल्वेतून उडी मारली.

या प्रकरणी महिलांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. कुर्ला आणि घाटकोपर रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीविरोधात रेल्वे कायद्यातील कलम १६२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. 

अंबिवली रेल्वे स्थानकावर काही दिवसांपासून साखळी चोरल्याची घटना घडली होती. त्या घटनेतील आरोपी हाच आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. 

Web Title : बुर्का पहनकर मुंबई लोकल के महिला डिब्बे में घुसा शख्स, मचा हड़कंप

Web Summary : मुंबई लोकल में एक आदमी बुर्का पहनकर महिला डिब्बे में घुस गया और कथित तौर पर महिला यात्रियों को छुआ। महिलाओं ने विरोध किया तो वह चलती ट्रेन से कूद गया। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है, और यह भी जांच कर रही है कि क्या वह पहले की चोरी की घटनाओं से जुड़ा है।

Web Title : Man in burqa enters Mumbai local's women's compartment, chaos ensues.

Web Summary : A man in a burqa entered a Mumbai local train's women's compartment and allegedly touched female passengers. Alerted women confronted him, leading him to jump from the moving train. Police have registered a case and are investigating if he is linked to prior theft incidents.