VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:25 IST2025-08-11T13:16:05+5:302025-08-11T13:25:38+5:30
Lion and King Kobra Video: जंगलाचा राजा सिंह कितीही बलवान असला तरीही त्याच्या सामर्थ्याला मर्यादा असते.

VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
Lion and King Kobra Video: इंटरनेट हे माहितीचे भांडार असते. त्यात सोशल मीडिया हे हल्ली मनोरंजनाचे साधन झाले आहे. या माध्यमातून विविध व्हिडिओ आणि गोष्टी झटपट व्हायरल होतात. हल्लीच्या काळात जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ खूपच व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सिंह आणि सिंहीण यांच्या मारामारीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सिंहासमोर आलेला किंग कोब्रा सापाचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरलही झाला आहे.
जंगलाचा राजा सिंह कितीही बलवान असला तरीही त्याच्या सामर्थ्याला मर्यादा असते. तो अशा प्राण्यांशी कधीही पंगा घेत नाही, ज्यांच्याविरोधात लढताना त्याला जीवाचा धोका असेल. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ याचे एक उत्तम उदाहरण आहे. या व्हिडिओमध्ये दोन सिंह आणि एक साप समोरासमोर येतात. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जंगलाचा राजा सिंह लगेच मागे हटतो आणि सापाला तिथून जाऊ देतो. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की दोन्ही सिंह बराच वेळ सापाकडे काळजीपूर्वक पाहतात. कोणीही पुढे जाण्याचे धाडस करत नाही. साप गेल्यानंतरच ते दोन सिंह आगेकूच करतात.
दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की शक्ती नेहमीच विजयाची हमी देत नाही. कधीकधी शहाणपण हे देखील सर्वात मोठे शस्त्र ठरू शकते. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @daniel_wildlife_safari नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. लोक यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.