Viral Video: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. कधी मनोरंजन, तर कधी अंगावर काटा आणणारे...सध्या अशाच प्रकारचा एक भयानक अपघाताचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर शहारे येतील.
ट्रक अचानक वळला अन् भरधाव बाइक धडकली
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, रस्त्यावर एक ट्रक अचानक वळण घेते. त्याचवेळी भरधाव वेगात येणारा बाइकस्कावर थेट ट्रकला धडकतो आणि ट्रकखाली अडकतो. या धडकेत दुचाकीस्वाराचे हेल्मेट ट्रकच्या लोखंडी भागात अडकल्याने मोठा अनर्थ टळतो. त्याच्या डोक्यावर हेल्मेट नसते, तर डोके थेट ट्रकला धडकल्याने फुटण्याची शक्यता होती.
हेल्मेटने वाचवला जीव
सुदैवाने, घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोन कामगारांनी तत्काळ मदतीस धाव घेतली. त्यांनी धाडस दाखवत दुचाकीस्वाराला सुरक्षितपणे बाहेर काढले. काही सेकंदांचा उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.
सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया
या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जीव वाचण्यामागे पूर्ण चेहरा झाकणारे हेल्मेट हे प्रमुख कारण ठरले. सोशल मीडियावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एका युजरने लिहिले, अरे बाप रे! ट्रक स्पष्टपणे वळणाचा इशारा देत होता. ही अत्यंत भयानक दुर्घटना आहे. दुसऱ्या युजरने म्हटले, वेग जास्त असल्याने अपघात टाळणे अशक्य झाले. तर आणखी एका युजरने लिहिले, ही दुर्घटना Taiwan मध्ये घडली. सुदैवाने, दुचाकीस्वार बचावला कारण त्याने योग्य हेल्मेट घातले होते.
Web Summary : A speeding biker in a viral video survived a near-fatal accident after colliding with a turning truck. His helmet, which got stuck, and quick-thinking bystanders saved him from serious injury. The incident highlights the importance of wearing helmets.
Web Summary : वायरल वीडियो में एक तेज रफ्तार बाइक सवार ट्रक से टकरा गया, लेकिन हेलमेट की वजह से उसकी जान बच गई। हेलमेट ट्रक में फंस गया, और आसपास के लोगों ने तत्परता दिखाते हुए उसे सुरक्षित बाहर निकाला। यह घटना हेलमेट पहनने के महत्व को दर्शाती है।