VIDEO : दुबईमधील मजुरांच्या जीवनाचं वास्तव, बघा कसे राहतात तिथे लोक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:32 IST2024-09-25T17:00:07+5:302024-09-25T17:32:42+5:30
Viral Video : इन्स्टाग्रावर यूजर एमडी रफीकने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तुम्ही येथील भारतीय मजुरांच्या जीवनाची कठोर वास्तविकता बघू शकता.

VIDEO : दुबईमधील मजुरांच्या जीवनाचं वास्तव, बघा कसे राहतात तिथे लोक!
Viral Video : दुबई किंवा सौदी अरबमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये भारतातील अनेक लोक उज्जव भविष्याची स्वप्ने घेऊ जात असतात. इथे वेगवेगळी कामे करण्यासाठी मजुरांची मोठी गरज पडते. दुबईमध्ये तर भारताच्या उत्तर प्रदेश, बिहारमधून हजारो लोक मजुरी करण्यासाठी जातात. कारण त्यांना तिथे भरपूर पैसे मिळतात. हे मजूर इथे कसे राहतात याचं चित्र दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इन्स्टाग्रावर यूजर एमडी रफीकने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तुम्ही येथील भारतीय मजुरांच्या जीवनाची कठोर वास्तविकता बघू शकता. तुम्ही नेहमीच दुबईमधील उचंच उंच इमारती, मोठाले मॉल्स, आलिशान हॉटेल्सचे व्हिडीओ पाहिले असतील. पण दुबईची दुसरी बाजू क्वचितच बघायला मिळते.
व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मोठा हॉल दिसत आहे. टिनाचं शेड आहे. तर आत अनेक लाईनमध्ये लावलेले बंक बेड दिसत आहेत. ज्यावर मजूर झोपलेले आहेत. इथे सगळे बेड दाटीवाटीने ठेवलेले आहेत.
हा हॉल एखाद्या अस्थायी संरचनेसारखा दिसत आहे. ज्यात बांगलादेश, पाकिस्तान, चीन आणि भारतातील मजूर राहतात. तापत्या उन्हात दिवसभर काम केल्यानंतर आराम करण्यासाठी या ठिकाणी येतात. सोशल मीडियावर लोक यावरून संताप व्यक्त करत आहेत.