Video: हॉटेल रुममध्ये थांबताय? मग 'ही' गोष्ट नक्की तपासा, अन्यथा पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:28 IST2026-01-06T16:28:06+5:302026-01-06T16:28:49+5:30
हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय.

Video: हॉटेल रुममध्ये थांबताय? मग 'ही' गोष्ट नक्की तपासा, अन्यथा पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही
Viral Video: आजच्या घडीला सोशल मीडिया केवळ टाइमपास किंवा मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नाही. अनेक युजर्स माहितीपूर्ण व्हिडीओ आणि पोस्टद्वारे लोकांना दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी सांगत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही चकीत व्हाल. विशेषतः जे लोक अनेकदा काम किंवा वैयक्तिक कारणांसाठी हॉटेलमध्ये थांबतात, त्यांच्यासाठी या व्हिडीओमधील माहिती खूपच महत्त्वाची आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय ?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोन वेगवेगळ्या आरशांवर एक पत्ता लावून अरशाची तपासणी करतो. पहिल्या आरशात पत्त्याची प्रतिमा आणि मूळ पत्ता यामध्ये कुठलेही अंतर (स्पेस) दिसत नाही. दुसऱ्या आरशात मात्र पत्ता आणि त्याची प्रतिमा यामध्ये थोडे अंतर स्पष्टपणे दिसते. यानंतर ती व्यक्ती दोन्ही आरशांच्या मागच्या बाजूला जाते. तेव्हा लक्षात येते की, ज्या आरशात पत्ता आणि प्रतिमा यांच्यात स्पेस दिसत होती, तो खरा आरसा (Normal Mirror) होता आणि जिथे कोणतीही स्पेस दिसत नव्हती, तो वन-वे मिरर (One-way Mirror) होता.
No space, leave this place pic.twitter.com/zMqJwWLqn8
— Interesting As Fuck (@interesting_aIl) January 5, 2026
याचा धोका काय?
वन-वे मिररचा अर्थ असा की, आरशाच्या एका बाजूने तुम्हाला स्वतःचे प्रतिबिंब दिसत असते, पण दुसऱ्या बाजूने कोणीही तुमच्यावर नजर ठेवू शकतो किंवा कॅमेऱ्याद्वारे तुमचे खासगी क्षण टिपू शकतो. त्यामुळे हॉटेल रूम, चेंजिंग रूम किंवा बाथरूममध्ये अशा आरशांचा वापर झाल्यास तो गोपनीयतेसाठी गंभीर धोका ठरू शकतो. हा व्हिडिओ हॉटेल रुममधील आरशांशी संबंधित सुरक्षेचा गंभीर मुद्दा समोर आणतो.
सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया
हा व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर @interesting_all या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “स्पेस नसेल, तर ती जागा सोडून द्या.” या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने कमेंट केली, “जिथेही थांबाल, तिथे ही चाचणी नक्की केली पाहिजे.” दुसऱ्याने लिहिले, “धन्यवाद, ही गोष्ट कायम लक्षात राहील.” तर तिसऱ्या युजरने म्हटले, “स्पेस नसेल, तर समजा कोणी तरी तुम्हाला पाहत आहे.”