VIDEO: 'इतके' हजार रुपये रोज..., पाणीपुरी विक्रेत्याची कमाई ऐकून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 19:57 IST2023-12-12T19:56:03+5:302023-12-12T19:57:19+5:30
इंस्टाग्रामलर हा व्हिडिओ चार कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

VIDEO: 'इतके' हजार रुपये रोज..., पाणीपुरी विक्रेत्याची कमाई ऐकून चक्रावून जाल
pani puri wala viral video: रस्त्यावर पाणीपुरी, भेळ, वडापाव किंवा अगदी चहा विकणारे अनेक लोक आहेत, जे महिन्याला लाखो रुपये कमावतात. अशा लोकांचे व्हिडिओदेखील अनेकदा व्हायरल होतात. यावरुन नोकरी चांगली कि व्यवसाय चांगला, असा वादही सोशल मीडियावर पाहायला मिळतो. दरम्यान, इंस्टाग्रामवर अशाच एका पाणीपुरी विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात त्याची कमाई ऐकून भलेभले डोक्याला हात लावतील.
विजय वोक्स नावाच्या इंस्टाग्राम चॅनलवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पाणीपुरी विक्रेता आपली रोजची सुमारे अडीच हजार रुपये असल्याचे सांगतोय. रोज अडीच हजार, म्हणजेच तो महिन्याला 75 हजार रुपये कमवतो. या व्हिडिओद्वारे अशा लोकांना ट्रोल केले जात आहे, त्यांनी शिक्षणात लाखो रुपये खर्च केले आणि आता अतिशय कमी पगार काम करत आहेत.
पाहा VIDEO -
हा व्हिडिओ आतापर्यंत 4 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अनेक लोक त्या पाणीपुरी विक्रेत्याच्या मेहनतीचे कौतुक करत आहेत. अल्प भांडवलात व्यवसाय सुरू करून भरपूर पैसा कमवता येतो, हेच या व्हिडिओवरुन सिद्ध होते.