तलावात आंघोळ करताना हंसाने चोच मारून मारून केलं बेहाल, व्यक्तीने पाण्यातून काढला पळ म्हणून वाचला जीव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 16:14 IST2022-06-08T16:01:40+5:302022-06-08T16:14:53+5:30
Viral Video : व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती एका तलावात आंघोळ करत आहे. त्याला जराही अंदाज नाही की, काही क्षणांमध्ये त्याच्यासोबत काय होणार आहे.

तलावात आंघोळ करताना हंसाने चोच मारून मारून केलं बेहाल, व्यक्तीने पाण्यातून काढला पळ म्हणून वाचला जीव...
Video Shared By Shakti Kapoor: इन्स्टाग्रामवर रोज हैराण करणारे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओ बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीला हसांच्या रागाचा सामना करावा लागतो.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती एका तलावात आंघोळ करत आहे. त्याला जराही अंदाज नाही की, काही क्षणांमध्ये त्याच्यासोबत काय होणार आहे. हंस त्याच्यावर हल्ला करणार असा काही विचार न करता तो पाण्यात मस्त आंघोळ करत आहे. पण अचानक असं काही घडतं ज्याचा त्याने विचारही केला नसेल.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोन काळ्या रंगाचे हंस व्यक्तीकडे येत आहेत. यातील एक हंस व्यक्ती पाण्यात आंघोळ करताना बघून चिडतो आणि अचानक त्याच्यावर हल्ला करतो. हंस आपल्या चोचीने व्यक्तीवर हल्ला करतो. व्यक्ती बचाव करण्यासाठी पाण्यात काही वेळ लपतो, पण तो बाहेर आला की, हंस हल्ला करतो. असं दोन तिनदा होतं. अशात व्यक्ती कसातरी आपला जीव वाचवून पळ काढतो.
शक्ती कपूर यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून त्याला 'लाफ बाबा लाफ' असं कॅप्शन दिलं आहे. इतकंच नाही तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक पोट धरून हसत आहेत. पण हे बघायला जरी गमतीदार वाटत असलं तरी अशी स्थिती फारच खतरनाक ठरू शकते.