Video: पोपटाने चोरी रोखली; चोर घरात शिरताच जोरजोरात ओरडला, पाहा मजेशीर व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:44 IST2025-10-25T13:43:22+5:302025-10-25T13:44:07+5:30

Viral Video: व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: Parrot stops theft; parrot screamed loudly as thief entered the house, watch the funny video | Video: पोपटाने चोरी रोखली; चोर घरात शिरताच जोरजोरात ओरडला, पाहा मजेशीर व्हिडिओ...

Video: पोपटाने चोरी रोखली; चोर घरात शिरताच जोरजोरात ओरडला, पाहा मजेशीर व्हिडिओ...

Social Media Viral Video: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या एका पोपटाचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत  पोपटाने चोरापासून घराची सुरक्षा कशी केली, हे दिसत आहे. रात्रीच्या अंधारात एक चोर खिडकीतून घरात घुसण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात पोपट जोरजोरात ओरडू लागतो. त्याच्या किंचाळण्याने घाबरुन चोर धूम ठोकतो. 

व्हिडिओच्या सुरुवातीला एक चोर शांतपणे खिडकी उघडून घरात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. पण घरातील पोपट सावध होतो आणि जोरात ओरडू लागतो. पोपटाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकताच चोर गोंधळून पळ काढतो. त्यानंतर घरातील महिला आवाज ऐकून जागी होते आणि लाईट लावते. पण, तोपर्यंत चोर तिथून फरार झालेला असतो.

सोशल मीडियावर लोकांच्या भन्नाट रिअॅक्शन

हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. कुणी म्हणालं, “घरात कुत्रा आणि पोपट असला की, चोर घुसू शकत नाही,” तर काहींनी विनोदानं लिहिलं, “चोर म्हणत असेल, हा पोपट तर सुपरस्टार निघाला!” आणखी एकानं लिहिलं, “असा नाईट गार्ड मिळाला तर कायच बोलायचं!” अनेकांनी या पोपटाचे तोंडभरुन कौतुकही केलं 

Web Title: Video: Parrot stops theft; parrot screamed loudly as thief entered the house, watch the funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.