Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:25 IST2025-06-19T19:25:19+5:302025-06-19T19:25:53+5:30
Viral Song: हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
Viral Song: दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी लोक सरत्या वर्षाला निरोप देऊन पुढील वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने करतात. लोक आशा करतात की, नवीन वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगले जाईल, त्यांना चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. तुम्हीही २०२५ चे स्वागत त्याच आशेने केले असेल. पण, यावर्षी आतापर्यंत देशात अनेक विपरित घटना घडल्या आहेत. अशा घटना, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. एका व्यक्तीने याच सर्व घटनांवर एक गाणे बनवले आहे. हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
गाण्यात त्या व्यक्तीने कोणत्या घटनांचा उल्लेख केला ?
सध्या व्हायरल होत असलेल्या गाण्याच्या सुरुवातीला तो व्यक्ती लोकांना विचारतो की, त्यांनी २०२५ मध्ये काय पाहिले? त्यानंतर तो म्हणतो, आपण वेळेपूर्वी मान्सून पाहिला. मे महिन्यात जून पाहिला, म्हणजेच तो कडक उन्हाबद्दल बोलतोय. यानंतर तो राजा रघुवंशीच्या हनिमूनवर झालेल्या हत्येबद्दल बोलतो. पुढे गाण्यात तो पहलगाम दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख करतो. त्यानंतर तो पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताने दिलेल्या प्रत्युत्तराचा, म्हणजेच ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करतो. इतकेच नाही तर तो गाण्यात ड्रम मर्डर केसचा देखील उल्लेख करतो. शेवटी आरसीबीची फायनल मॅच आणि अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातावरही भाष्य करतो.
पाहा-
गाणे व्हायरल
हे गाणे इंस्टाग्रामवर गरमकलाकर नावाच्या अकाउंटवरून पोस्ट केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, '2025 आधा अभी बाकी है, बस कर खुदा इतना अभी काफी है.' बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, हे गाणे ६२ लाख ४६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. गाणे ऐकून नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. तसेच वेगवेगळ्या इमोजीद्वारे त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.