VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 17:25 IST2025-10-02T17:24:43+5:302025-10-02T17:25:17+5:30
man jumping viral video: प्रसिद्धीच्या वेडापायी अनेक जण काहीही विचार न करता स्टंट करताना दिसतात

VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
man jumping viral video: जगात असे अनेक लोक आहेत जे धोकादायक स्टंट करण्यास अजिबात मागे-पुढे पाहत नाहीत. एखाद्या डोंगराच्या कड्यावरून उडी मारणे असो किंवा एका चाकावर बाईक चालवणे असो, रिल किंवा प्रसिद्धीच्या वेडापायी अनेक जण काहीही विचार न करता असे स्टंट करताना दिसतात. अशाच एका धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोक थक्क झाले आहेत.
व्हिडिओमध्ये एका उंच इमारतीच्या छतावर दोन मुले उभे आहेत. त्यापैकी एक जण अचानक खाली उडी मारतो. ते पाहून व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीच्या काळजाचा ठोका चुकतो. पण तितक्यात तो मुलगा उडी मारून स्विमिंग पूलमध्ये पडतो. सहसा लोक इतक्या उंचीवरून उडी मारण्यास घाबरतात, कारण थोडीशी चूक देखील जीवघेणी ठरू शकते. पण या मुलाला अजिबात भीती वाटत नाही. अगदीच्या नेहमीच्या कामाप्रमाणे सहजतेने तो उडी मारतो. पाहा व्हिडीओ-
यह वीडियो देखकर आपकी धड़कनें तेज हो जाएगी 😱😱
— Sandeep Choudhary (@ChoudhriSandy) October 1, 2025
बिल्डिंग से सीधी छलांग ... क्या यह पागलपन है?!!👇 pic.twitter.com/RtYOcsK0u2
धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @ChoudhriSandy या अकाउंटने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "हा व्हिडिओ तुमच्या हृदयाचा ठोका चुकवेल. इमारतीवरून थेट उडी मारणे... हा वेडेपणा आहे?" हा १६ सेकंदांचा व्हिडिओ २ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच शेकडो लोकांनी विविध प्रकारे कमेंट्सदेखील केल्या आहेत.