Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 21:32 IST2025-07-13T21:30:39+5:302025-07-13T21:32:10+5:30

wildlife video trending news: एका चित्त्याने असे काही केलं, ज्याची कुणीही कल्पना केली नसेल

Video Oh my god While the tourist was in front of him the cheetah suddenly stood on two legs like a human trending | Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...

Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...

wildlife viral video : सोशल मीडियावरजंगलातीलव्हायरल व्हिडिओ आपल्याला बरेचदा पाहायला मिळतात. ते पाहिल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवणे खूप कठीण होऊन जाते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये एका चित्त्याने असे काही करून दाखवले आहे, ज्याची कुणीही कल्पना केली नसेल. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आणि लोकांनी तो एकमेकांसोबत शेअर करायलाही सुरुवात केली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध क्रुगर राष्ट्रीय उद्यानातील आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की बिबट्या शांतपणे इम्पालाची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या दरम्यान तो आधी माणसांसारखा त्याच्या दोन्ही पायांवर बसतो आणि आपल्या भक्ष्याला शोधू लागतो. त्यानंतर भक्ष्याचा शोध घेण्यासाठी तो आपल्या दोन पायांवर उभाही राहतो.

हे पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित होतात आणि हे आपापल्या कॅमेऱ्यातून टिपतात. रिपोर्टनुसार, कुमाना धरणाजवळ सफारीला गेलेल्या मेरी टार्डनने हे अनोखे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. सर्वात आधी लेटेस्ट साईटिंग क्रुगर या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. तिथून पुढे तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.

शिकार करताना चित्ता असे करत आहे जेणेकरून तो त्याचे भक्ष्य स्पष्टपणे पाहू शकेल आणि संधी मिळताच तो त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला करू शकेल की भक्ष्याला पळून जाता येऊ शकणार नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, युजर्सनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. अनेकांनी या पद्धतीला शिकारीचे तंत्र म्हटले आहे.

Web Title: Video Oh my god While the tourist was in front of him the cheetah suddenly stood on two legs like a human trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.