Video : Mysterious insects video goes viral people says nature is amazing api | उभ्या आयुष्यात तुम्ही असा जीव पाहिला नसेल, व्हिडीओ पाहून लोक झाले हैराण कारण...

उभ्या आयुष्यात तुम्ही असा जीव पाहिला नसेल, व्हिडीओ पाहून लोक झाले हैराण कारण...

इंटरनेटमुळे जगातील अशा गोष्टी समोर येतात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. असाच एक आश्चर्यकारक जीवाचा व्हिडीओ समोर आला आहे. आयएफएस प्रवीण कासवान यांनी एक भन्नाट व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत. कारण यात दिसणारा जीव हा गवतासारखा आहे. 

हा जीव पहिल्यांदा बघाल तर हा एखादा जीव असल्याचं जाणवणार नाही. असं वाटेल हे तर गवत आहे किंवा झाडाची पालवी आहे. पण सत्य वेगळंच आहे. हा निसर्गाद्वारे तयार करण्यात आलेला एक सुंदर जीव आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'निसर्ग आपलं काम फार चांगलं करतो. पण ते सगळंच आपण बघू शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही आतापर्यंत असा जीव पाहिला नसेल. कमाल आहे निसर्गाची. हा व्हिडीओ Maria Chacon यांनी शूट केला आहे'.

हा जीव दक्षिण अमेरिकेत आढळतो आणि याला Lichen Katydid असं नाव आहे. 

हा व्हिडीओ 16 मार्चला शेअर करण्यात आला होता. आणि आतापर्यंत हा व्हिडीओ 15 हजार लोकांनी पाहिला आहे. तर 1 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video : Mysterious insects video goes viral people says nature is amazing api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.