Shocking! रेल्वे ट्रॅकवर बाइकसोबत करत होता स्टंट, अचानक समोरून आली रेल्वे आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 15:08 IST2021-06-11T15:07:00+5:302021-06-11T15:08:15+5:30
मीडिया रिपोर्टनुसार, ही व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर स्टंट करत होती. तेव्हाच अचानक रेल्वे आली. रेल्वे खूप जवळ येईपर्यंत त्याने स्कूटी ट्रॅकवरून हटवण्याचा प्रयत्न केला.

Shocking! रेल्वे ट्रॅकवर बाइकसोबत करत होता स्टंट, अचानक समोरून आली रेल्वे आणि मग....
अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर स्कूटीसोबत स्टंट करताना दिसत आहे. पण अचानक समोरून रेल्वे येताना दिसल्यावर जे झालं ते बघून लोकांची झोप उडाली आहे.
टीव्ही९ नुसार, हा व्हिडीओ गुजरातमधील आहे. येथील एक व्यक्ती जामनगर रेल्वे ट्रॅकवर फोटोग्राफी करण्यासाठी गेला होता. सांढिया पूलाजवळ त्याने रेल्वे ट्रॅकवर गाडी उभी केली. तोही तिथेच होता. तर काही अंतरावर एक फोटोग्राफर आहे. अशातच समोरून रेल्वे येते. तरूणाने गाडी ट्रॅकवरून हटवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याला गाडी काही काढता आली नाही. तो मात्र मरता मरता वाचला. त्याची स्कूटी रेल्वेसोबत फरफटत गेली.
मीडिया रिपोर्टनुसार, ही व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर स्टंट करत होती. तेव्हाच अचानक रेल्वे आली. रेल्वे खूप जवळ येईपर्यंत त्याने स्कूटी ट्रॅकवरून हटवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्यात काही यश मिळालं नाही. अखेर त्याने बाजूला उडी घेऊन जीव वाचवला. त्याने रेल्वे चालकाला थांबण्यासाठी हातही दाखवला होता. पण त्याचा काही फायदा झाला नाही.
सोशल मीडियावर शेअर या व्हिडीओत रेल्वे अॅक्टिवा गाडीला काही सेकंद आपल्यासोबत फरफटत नेताना दिसत आहे. तर व्यक्ती अखेरच्या क्षणी स्वत:ला वाचवण्यात यशस्वी ठरला. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट करत असून या प्रकाराला मूर्खपणा सांगत आहेत. या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणीही काहींनी केली आहे.