नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:37 IST2025-11-03T16:36:13+5:302025-11-03T16:37:02+5:30
Video - केरळमधील एका वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नात असं काही केलं ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
सोशल मीडियावर विविध व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. अशातच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. डिजिटल युगात आता लग्नात आहेर देण्याची पद्धत बदलत आहे. केरळमधील एका वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नात असं काही केलं ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांनी त्यांच्या शर्टच्या खिशाला QR कोड लावून पाहुण्यांकडून डिजिटल पद्धतीने आहेर घेतला.
व्हायरल व्हिडिओमध्ये नवरीच्या वडिलांनी त्यांच्या शर्टच्या खिशाला पेटीएम QR कोड लावलेला दिसत होता. पाकिटातून आहेर देण्याऐवजी पाहुणे आता त्यांचा फोन बाहेर काढतात, स्कॅन करतात आणि लगेचच पैसे ट्रान्सफर करतात. याच दरम्यान लग्नाची जोरदार तयारी केलेली पाहायला मिळत आहे.
Brides Father 🤣* in Kerala
— சங்கரிபாலா (@sankariofficial) October 29, 2025
New Marriage Trend 🙏🙏
தட் மணமகளின் அப்பா …
செலவு அப்படிங்க…!!!! pic.twitter.com/94HbpvXrJn
सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होताच युजर्सनी मजेदार कमेंट्स करण्यास सुरुवात केली. एका युजरने "डिजिटल इंडिया का अब शादी एडिशन!" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "आता रोख रक्कम नाही, फक्त स्कॅन करा" असं म्हटलं आहे.
लोकांनी हे पाऊल प्रॅक्टिकल आणि इको फ्रेंडली असल्याचं म्हटलं आहे. कारण यामुळे रोख रक्कम आणि कागद दोन्ही वाचतात. काही युजर्सनी या ट्रेंडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. लग्नासारख्या पारंपारिक प्रसंगी डिजिटल व्यवहार थोडे विचित्र वाटतात असं म्हटलं आहे. काही लोकांना हा ट्रेंड अजिबात आवडलेला नाही.