Video - जिद्दीला सलाम! एक पाय नाही पण हिंमत नाही हारली; रोज 1 किमी उड्या मारत जाते शाळेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 17:03 IST2022-05-25T16:57:44+5:302022-05-25T17:03:25+5:30
Video : सीमा नावाची ही मुलगी शाळेत पोहोचण्यासाठी दररोज 1 किलोमीटरचा प्रवास उड्या मारत करते.

फोटो - NBT
नवी दिल्ली - सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. अशाच एका 10 वर्षांच्या मुलीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये शाळेचा गणवेश घातलेली आणि बॅग घेऊन एक मुलगी एका पायावर उड्या मारत जाताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, हे प्रकरण बिहारच्या जमुई जिल्ह्यातील आहे. जिथे सीमा नावाची ही मुलगी शाळेत पोहोचण्यासाठी दररोज 1 किलोमीटरचा प्रवास उड्या मारत करते. एका रस्ते अपघातात त्या तिला एक पाय गमवावा लागला. मात्र या मुलीचा उत्साह आणि जिद्द पाहून सर्वजण तिला सॅल्यूट करत आहेत.
'दैनिक भास्कर'च्या रिपोर्टनुसार, सीमा शाळेत जाते आणि खूप मन लावून अभ्यास करते. तिचं मोठं होऊन शिक्षक व्हायचं स्वप्न आहे. जेणेकरून ती गरीबांना शिकवू शकेल आणि त्यांचे जीवन चांगले करू शकेल. खैरा ब्लॉकच्या नक्षलग्रस्त भागात असलेल्या फतेपूर गावात ती तिच्या कुटुंबासह राहते. मुलीचे वडील खिरन मांझी बिहारबाहेर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई, बेबी देवी 6 मुलांची काळजी घेते. सीमाचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे.
सलाम है 10 साल की इस बच्ची सीमा के जज़्बे और हिम्मत को!
— Taara Malhotra (@TaaraMalhotra) May 25, 2022
जमुई में एक पैर पर 1KM कूदकर जाती है स्कूल: हादसे में मासूम का काटना पड़ा था पैर!
सीमा कहती है कि इसलिये पढ़ती हूँ ताकि गरीबों को पढ़ा सकूं#Jamui#Bihar#Viral#ViralVideo#PositiveVibes#GoodVibes#Mentalhealthpic.twitter.com/gPsOdxTGIj
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टॅग करत मंत्री डॉ. अशोक चौधरी यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं आहे. यामध्ये आता सीमा चालेल आणि शिकेल. आता 'महावीर चौधरी ट्रस्ट' जमुई जिल्ह्यातील खैरा ब्लॉकच्या फतेहपूर गावात राहणाऱ्या सीमा या गुणवंत मुलीवर योग्य उपचार करण्याची जबाबदारी उचलणार आहे. हे प्रकरण मंत्री श्री @sumit4chakai जी यांच्या विधानसभा मतदारसंघाशी संबंधित आहे असं म्हटलं आहे.
दोन वर्षांपूर्वी सीमाचा एक पाय रस्ता अपघातामुळे कापावा लागल्याचं सांगण्यात आलं आहे. पण सीमाची शिकण्याची जिद्द कमाल आहे. कोणाच्याही मदतीशिवाय 1 किलोमीटर उड्या मारून ती दररोज शाळेत जाते. आता सोशल मीडियावर लोक सीमाच्या हिंमतीला सलाम करत आहेतच, पण काही लोक तिच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.