Video: Elephant Squishes Car in Khao Yai National Park in Thailand | Video : हत्ती कारवर बसणार होता इतक्यात ड्रायव्हरने केली आयडियाची कल्पना अन्....

Video : हत्ती कारवर बसणार होता इतक्यात ड्रायव्हरने केली आयडियाची कल्पना अन्....

हत्तीचे जंगलातील वेगवेगळे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. अनेकदा हत्तीला एखाद्या कारला धडक देतांना, झाडे तोडतांना पाहिलं असेल. पण सद्या एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील दृश्यासारखं तुम्ही कधीही पाहिलं नसेल. ही घटना आहे थायलॅंडची. Khao Yai National Park मधून एक कार जात होती. तेव्हाच समोरून हत्ती आला. ड्रायव्हरने कार थांबवली. आधी तर हत्ती कारसोबत मस्ती करू लागला आणि नंतर थेट कारवर बसण्यासाठी तो प्रयत्न करू लागला.

हत्ती बराचवेळ कारसोबत खेळत होता आणि अचानक तो कारच्या टपावर बसण्याचा प्रयत्न करू लागला होता. पण त्याला काही वर चढता येत नव्हतं. नंतर तो अशा स्थितीत आला की, खाली बसला असता तर कारचा चेंदामेंदा झाला असता.

रिपोर्ट्सनुसार, ३५ वर्षीय Duea या कारमध्ये होता. संधी मिळताच त्याने कार हत्तीच्या खालून वेगाने काढली. असं केलं नसतं तर काय झालं असतं याचा अंदाज नाही. हत्तीवर कारवर बसण्याचा प्रयत्न करत असल्याने कारचे काच तुटलेत. कारचं नुकसानही झालं. या घटनेतून हे शिकता येतं की, अशाप्रकारच्या स्थितीतून बाहेर कसं पडायचं.


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: Elephant Squishes Car in Khao Yai National Park in Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.