Student Attacked on School Teacher: बारावी वर्गामध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवरच हल्ला केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. रस्त्याने शिक्षिकेसोबत चालत असताना विद्यार्थ्याने हल्ला केला. बळजबरी करत रस्त्यातच शिक्षिकेचे चुंबन घेत ओठांना चावला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून विद्यार्थ्याचा शोध सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये ही घटना घडली आहे. विद्यार्थी बारावी वर्गात शिकत आहे. त्याचे शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम होते. त्याने यापूर्वी बऱ्याचदा गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. २६ जानेवारी २०२६ रोजी त्याने शिक्षिकेला रस्त्यात गाठून बळजबरी करण्याचा प्रकार घडला.
शिकवणी घेण्यासाठी जात असतानाच...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी शिक्षिका शिकवणी घेण्यासाठी जात होती. त्याचवेळी विद्यार्थी आला. त्याने शिक्षिकेच्या खांद्यावर हात टाकला. तिच्यासोबत जबरदस्ती करण्यास सुरुवात केली.
शिक्षिकेने विरोध करता त्याने शिक्षिकेला पकडले आणि भररस्त्यातच बळजबरी चुंबन घेतले. शिक्षिका विरोध करत असत तो तिच्या ओठांना जोरात चावला, ज्यामुळे शिक्षिकेचा ओठ चिरला गेला.
विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत घाणेरडे कृत्य, व्हायरल व्हिडीओ
शिक्षिकेच्या बहिणीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मैनपुरी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्याच्या आईवडिलांनीही पोलिसांना तक्रार दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, यापूर्वी विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत केलेल्या कृत्याची माहिती घेत आहोत. त्यादिवशी घडलेल्या घटनेचा व्हिडीओही पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थी फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलीस पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्याला लवकरच अटक करू असे पोलिसांनी सांगितले.
Web Summary : A class 12 student in Mainpuri, UP, attacked his teacher due to unrequited love. He forcibly kissed and bit her lip, causing injury. Police have registered a case and are searching for the absconding student. The incident occurred while the teacher was going for tutoring.
Web Summary : मैनपुरी, यूपी में एक 12वीं के छात्र ने एकतरफा प्यार में अपनी शिक्षिका पर हमला किया। उसने जबरदस्ती किस किया और होंठ काट लिया, जिससे वह घायल हो गईं। पुलिस ने मामला दर्ज कर फरार छात्र की तलाश शुरू कर दी है। घटना उस समय हुई जब शिक्षिका ट्यूशन के लिए जा रही थी।