Video: धोकादायक स्टंट भोवला; हाताला, शरीराला अन् आजुबाजूच्या लोकांनाही लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 21:19 IST2025-02-10T21:17:41+5:302025-02-10T21:19:58+5:30
Trending Video: हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: धोकादायक स्टंट भोवला; हाताला, शरीराला अन् आजुबाजूच्या लोकांनाही लागली आग
Trending Video:सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही कॉमेडी, काही ह्युमर काही अपघात तर काही धोकादयक स्टंटचे व्हिडिओ असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेलच, शिवाय व्हिडिओतील तरुण मूर्ख आहे का? असा प्रश्नही तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.
धोकादायक स्टंट भोवला
व्हिडिओमध्ये एक अल्पवयीन मुलगा स्टेजवर हाताला आग लावून एका हाताने फरशा तोडताना दिसतोय. पण, अचानक ही आग त्याच्या हाताला आणि नंतर शरीराला लाग लागल्याचे दिसते. धक्कादायक बाब म्हणजे, त्या मुलाच्या अंगाला लागलेली आग आजुबाजूच्या आणखी 2-3 लोकांनाही लागल्याचे व्हिडिओत दिसते.
स्टंट कर रहे बच्चे की हाथ में आग पकड़ ली. बग़ल में खड़े इंसान ने पानी की जगह तेल डाल दिया. देखें कितना ख़तरनाक वीडियो है. pic.twitter.com/3XrUBb0UAu
— Priya singh (@priyarajputlive) June 23, 2024
मुलाच्या हातावर पाण्याऐवजी ओतले तेल
आजूबाजूचे लोक मुलाच्या हाताची आग विझविण्याचा प्रयत्न करतात, पण एक व्यक्ती चुकून पाण्याऐवजी तेलाने भरलेली बाटली मुलाच्या हातावर टाकतो, यामुळे आग आणखी वाढते. सुदैवाने त्या मुलाचे प्राण वाचले असले तरी, त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
हा व्हिडिओ तामिळनाडूच्या शाळेतील असून, सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. आतापर्यंत याला लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच, अनेक युजर्स यावर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काही युजर्स त्या मुलाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत, तर काहीजण या स्टंटला मूर्खपणाचे म्हणत आहेत.