VIDEO : शिक्षकाच्या पॅंटमधून बाहेर आला लांबलचक साप, बघून विद्यार्थ्यांचा उडाला थरकाप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 16:44 IST2024-10-11T16:39:35+5:302024-10-11T16:44:27+5:30
Snake In Pant Video: थरकाप उडवणारा हा व्हिडीओ स्नेक स्पेशलिस्टच्या देखरेखीत रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडिओत बघू शकता की, कशाप्रकारे साप व्यक्तीच्या पॅंटमधून बाहेर येत आहे.

VIDEO : शिक्षकाच्या पॅंटमधून बाहेर आला लांबलचक साप, बघून विद्यार्थ्यांचा उडाला थरकाप!
Snake In Pant Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेला सापाचा एक व्हिडीओ पाहून लोक सध्या हैराण झाले आहेत. कारण यात एका व्यक्तीच्या पॅंटमधून एक लांबलचक कोब्रा बाहेर येताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. थरकाप उडवणारा हा व्हिडीओ स्नेक स्पेशलिस्टच्या देखरेखीत रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडिओत बघू शकता की, कशाप्रकारे साप व्यक्तीच्या पॅंटमधून बाहेर येत आहे.
थायलॅंडच्या एका शाळेत कार्यक्रमादरम्यान शिक्षक विद्यार्थ्यांना काही महत्वपूर्ण गोष्टी शिकवत होते. तेव्हाच अचानक शिक्षकाच्या पॅंटमधून साप बाहेर आला. हे दृश्य पाहून विद्यार्थी तर घाबरलेच सोबतच, शाळेतील कर्मचारीही घाबरले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघू शकता की, शिक्षकाच्या पॅंटमधून कोब्रा बाहेर काढला जात आहे.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @indypersian नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ थायलॅंडमधील एका शाळेतील आहे. इथे विद्यार्थ्यांसाठी डेमो कार्यक्रमादरम्यान ट्रेनिंग सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी फारच हुशारीने शिक्षकाच्या पॅंटमधून साप काढला.