Video: पेट्रोल पंपावर पेटवली सिगारेट; संतापलेल्या कर्मचाऱ्याने दिला बेदम चोप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 18:45 IST2024-08-13T18:45:10+5:302024-08-13T18:45:52+5:30
Video: पेट्रोल पंपावर पेटवली सिगारेट; संतापलेल्या कर्मचाऱ्याने दिला बेदम चोप...

Video: पेट्रोल पंपावर पेटवली सिगारेट; संतापलेल्या कर्मचाऱ्याने दिला बेदम चोप...
Viral Video : पेट्रोल पंप ही अतिशय संवेदनशील जागा आहे. पेट्रोल पंपाच्या परिसरात एखादी ठिणगी जरी पडली, तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळेच पंपावर विडी-सिगारेट पेटवण्यास, ज्वलनशील पदार्थ घेऊन येण्यास किंवा फोनवर बोलण्यास मनाई केली जाते. पण, जगात काही असेही लोकंही आहेत, जे नियम मोडून पंपावर सिगारेट ओढतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण, व्हिडिओ जे घडले, ते पाहून तुम्ही चकीत व्हाल.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय ?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येतो. दोन कर्मचारी आणि अन्य एक व्यक्ती तिथे उपस्थित आहे. कर्मचारी पेट्रोल भरण्यासाठी गेला असता ग्राहक सिगारेट पेटवतो. हे पाहून संतापलेल्या कर्मचारी त्याला बेदम चोपतो. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि ही घटना कधी घडली, याची माहिती मिळू शकली नाही, मात्र हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पहा:-
बड़े ही तेजस्वी लोग है 😂😂 pic.twitter.com/U9Fag46NqK
— Mikoo (@Mr_mikoo) August 12, 2024
हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @Mr_mikoo नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला दहा हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे, तर अनेकजण यावर कमेंट्स करत आहेत. दरम्यान, या व्हिडिओतून एक गोष्ट समजते की, पेट्रोल पंपासारख्या संवेदनशील परिसरात विडी-सिगारेट पेटवू नये. यामुळे मोठा स्फोट होऊन जीवित आणि वित्तहानी होऊ शकते.