Viral Video: आजकाल अनेकजण ChatGPT सारख्या Ai चा सर्रास वापर करतात. Ai चा वापर इतका वाढला आहे की, लोक यावरच विश्वास ठेवू लागले आहेत. बरेच लोक Ai कडून मिळालेल्या माहितीला सत्य मानतात. मात्र, माहिती तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणे अनेकदा महागात पडते. अशीच काहीशी घटना एका स्पॅनिश जोडप्यासोबत घडली. Ai वर विश्वास ठेवणे या जोडप्याला चांगलेच महागात पडले.
सध्या एका स्पॅनिश महिलेचा रडत असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला सांगते की, Ai चॅटबॉटमुळे तिची फ्लाइट चुकली. महिलेने प्रियकरासोबत एकत्र फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता, ChatGPT मुळे त्यांचा प्लॅन रद्द झाला.
नेमकं काय झालं?न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मेरी कॅल्डास नावाच्या महिलेला ChatGPT कडून व्हिसाबद्दल चुकीची माहिती मिळाली. महिलेने प्रियकरासह प्यूर्टो रिकोला जाण्याचा प्लॅन केला होता, पण ChatGPT च्या चुकीच्या माहितीमुळे त्यांचा प्लॅन रद्द झाला.
व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियाया घटनेनंतर त्या महिलेने रडत रडत आपला व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओत महिला गमतीने म्हणते की, तिने अनेकदा चॅटजीपीटीचा चुकीचा वापर केला, त्यामुळे तिच्यावर सूड घेतला. व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.