VIDEO : हायवेच्या मधोमध कारवाल्याने केला असा मूर्खपणा, बघता बघता दोन ट्रक झाले पलटी..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 16:53 IST2022-05-27T16:48:23+5:302022-05-27T16:53:26+5:30
Accident On Highway: अनेकदा गाड्या खतरनाक पद्धतीने पलटी मारतात. काही अपघात हे काही लोकांच्या मूर्खपणामुळे तर काही रोड खराब असल्याने किंवा दारूच्या नशेत होतात.

VIDEO : हायवेच्या मधोमध कारवाल्याने केला असा मूर्खपणा, बघता बघता दोन ट्रक झाले पलटी..
Accident On Highway: जगभरात दररोज लाखो अपघात होतात. आतील काही अपघात इतके खतरनाक असतात की, जे बघून रात्रीची झोप उडते. रोजवरील अपघातात अनेक गाड्यांची अशी टक्कर होते की, बघून अंगावर काटा येतो. अनेकदा गाड्या खतरनाक पद्धतीने पलटी मारतात. काही अपघात हे काही लोकांच्या मूर्खपणामुळे तर काही रोड खराब असल्याने किंवा दारूच्या नशेत होतात.
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, दुसऱ्यांचा जीव वाचवण्याच्या नादात मोठा अपघात होतो आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा स्वत: आपला जीव गमावून बसतो. सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की, दुसऱ्यांचा जीव वाचवण्याच्या नादात कसे लोक आपला जीव गमावतात. तेच हेही बघता येऊ शकतं की, एका छोट्या चुकीमुळे मोठा अपघात होऊ शकतो.
“Girl, hoId on I missed my turn” pic.twitter.com/7Upbb0tnN1
— d🦕n (@javroar) May 25, 2022
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, हायवेच्या मधोमध एक कारवाला मूर्खपणा करतो आणि ब्रेक लावून मधेच थांबतो. तेच कार वाचवण्याच्या नादात दोन ट्रक पलटी मारतात. त्यानंतर कारवाला जणू काही झालंच नाही अशाप्रकारे तिथून हळूच निघून जातो. हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. बघू शकता की, हायवेवर वेगाने गाड्या जात आहेत. अशात एक पांढऱ्या रंगाची कार रस्त्यात मधोमध थांबते.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कारला वाचवण्याच्या नादात भरधाव येणारा ट्रक पलटी होतो. याने कारवाल्याला काहीच फरक पडत नाही. तो हळूहळू कार वळवतो. अशात ट्रक येतो आणि कारला टक्कर लागू नये म्हणून स्पीड कमी करतो आणि पलटी मारतो. सध्या हे समजू शकलेले नाही.