Video: हलगर्जीपणा! लहान मुलाच्या हातात दिली वाघाची साखळी, हल्ला करणार तेवढ्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 17:45 IST2024-01-03T17:44:43+5:302024-01-03T17:45:54+5:30

Tiger Video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी टीका करत आहेत.

Video: A chain of a tiger given in the hand of a child, he was about to attack | Video: हलगर्जीपणा! लहान मुलाच्या हातात दिली वाघाची साखळी, हल्ला करणार तेवढ्यात...

Video: हलगर्जीपणा! लहान मुलाच्या हातात दिली वाघाची साखळी, हल्ला करणार तेवढ्यात...

Pakistan Tiger Video:सोशल मीडियावर दररोज विविध कंटेट व्हायरल होतो. लोकही व्हायरल होण्यासाठी कुठल्याही थराला जातात. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानातून समोर आला आहे. नोमान हसन नावाचा तरुण व्हायरल होण्यासाठी चक्क वाघांसोबत व्हिडिओ बनवतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय, जो पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कुत्र्याप्रमाणे वाघाच्या गळ्यात साखळी बांधलेली दिसत आहे आणि ही साखळी एका लहान मुलाच्या हातात दिलीये. हा लहान मुलगा त्या महाकाय आकाराच्या वाघाला घेऊन फिरतोय. यावेळी अचानक वाघ चिडतो आणि मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, मात्र तेवढ्यात हसन त्याला रोखतो. 

पोस्ट केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला, पण नेटकरी हसनवर टीका करत आहे. लहान मुलाच्या हातात वाघाला सोपवणे मोठा हलगर्जीपणा असल्याचे अनेकांचे म्हणने आहे. या व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: Video: A chain of a tiger given in the hand of a child, he was about to attack