250 रुपयांत एक वडापाव! फ्लाइटमधल्या वडापावच्या किमतीवरुन सोशल मीडियात एकच कल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 08:29 PM2022-03-15T20:29:30+5:302022-03-15T20:32:14+5:30

तुम्ही जर कधी विमानतळावर गेला असाल किंवा फ्लाइटने प्रवास केला असेल, तर तिथे अन्न आणि पाण्यापासून किती महागड्या वस्तू मिळतात हे तुम्हाला चांगलेच माहित असेल.

Vada Pav Worth Rs 250 in flight Twitter user shares a Expensive Flight Food Story | 250 रुपयांत एक वडापाव! फ्लाइटमधल्या वडापावच्या किमतीवरुन सोशल मीडियात एकच कल्ला...

250 रुपयांत एक वडापाव! फ्लाइटमधल्या वडापावच्या किमतीवरुन सोशल मीडियात एकच कल्ला...

googlenewsNext

तुम्ही जर कधी विमानतळावर गेला असाल किंवा फ्लाइटने प्रवास केला असेल, तर तिथे अन्न आणि पाण्यापासून किती महागड्या वस्तू मिळतात हे तुम्हाला चांगलेच माहित असेल. जिथे तुम्हाला बाहेर कोणताही खाद्यपदार्थ 10-20 रुपयांना मिळतो, तर फ्लाइटमध्ये त्याच वस्तूची किंमत 150-200 रुपयांच्या वर जाते. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध स्नॅक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडापावची किंमत जास्तीत जास्त किती असेल? वडापाव हे मुंबईत सर्वाधिक विकले जाणारे स्ट्रीट फूड आहे, ज्याची किंमत 10-20 रुपयांपासून सुरू होते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फ्लाइटमध्ये याच वडापावची किंमत 100-150 नाही तर चक्क 250 रुपयांपर्यंत जाते. होय, सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल.

पुलकित कोचर नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर हँडलवर फ्लाइटच्या मेनू कार्डचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये वडापावची किंमत 3 डॉलर म्हणजेच 250 रुपये सांगितली गेली आहे. आता तुम्ही कल्पना करू शकता की मुंबईच्या रस्त्यांवर वडापाव १०-२० रुपयांना विकला जात असला तरी विमान प्रवासात त्याची किंमत अनेक पटींनी वाढते. ज्यांना वडापावची किंमत माहीत नाही, ते फ्लाइटमध्ये खरेदी करू शकतात, पण ज्यांना माहिती आहे, ते फ्लाइटमध्ये वडापाव क्वचितच खातात. 

वडापावच्या किमतीचं मेन्यूकार्डचा फोटो पुलकित कोचरनं शेअर केल्यानंतर लोकांनी फ्लाइटमधील जेवणाचे अनुभव देखील शेअर करण्या सुरुवात केली आहे. सुमारे 5 वर्षांपूर्वी फ्लाइटमध्ये फक्त एक वाटी पोहे 200 रुपयांना विकत घेतले होते, असा अनुभव एका यूजरने शेअर केला आहे. तर आणखी एका यूजरने असेही सांगितले की, 3 वर्षांपूर्वी फ्लाइटमध्ये त्याने चिकन नूडल्स 300 रुपयांना विकत घेतले होते. विमानतळावर 260 रुपयांना चिकन रोल विकत घेतल्याचंही एकानं सांगितलं आहे. त्याचवेळी इतर काही युजर्सनीही वडापावची पोस्ट पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: Vada Pav Worth Rs 250 in flight Twitter user shares a Expensive Flight Food Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.