शेजाऱ्यांचा खांदा देण्यास नकार; पती एकटाच सायकलवर मृतदेह ठेवून निघाला, पोलिसांना कळताच.....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:48 PM2021-04-28T12:48:35+5:302021-04-28T12:59:50+5:30

CoronaVirus : शेजार्‍यांकडे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीवर नेण्यासाठी सहकार्य मागितले, परंतु कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं कळताच कोणीही समोर आलं नाही.

Uttarpradesh Body of the wife on the bicycle the police showed humanity performed the last rites | शेजाऱ्यांचा खांदा देण्यास नकार; पती एकटाच सायकलवर मृतदेह ठेवून निघाला, पोलिसांना कळताच.....

शेजाऱ्यांचा खांदा देण्यास नकार; पती एकटाच सायकलवर मृतदेह ठेवून निघाला, पोलिसांना कळताच.....

Next

कोरोनाकाळात आपली माणसंही परकी झाल्याचं अनेक ठिकाणी दिसून येत आहे. देशभरात अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक खांदा देण्यासाठी पुढे येत नाहियेत. अशा भयावह स्थितीत उत्तरप्रदेशातील  जौनपूरच्या पोलिसांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. मृत पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी  गावातून चार माणसंही पुढे  न आल्यामुळे पतीनं मृतदेह सायकलवर ठेवला आणि नदीकाठी जाऊ लागला. माहिती मिळताच पोलिसांनी अंत्यंसंस्कारांचे सामान आणि मृतदेह घाटावर नेण्यासाठी वाहन पुरवले. ही घटना माडिहु कोतवाली परिसरातील अंबरपूर गावाची आहे.

तिलकधारी सिंग यांची पत्नी राजकुमारी (वय ५६ ) यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन टिळकधारी गावात पोहोचले. शेजार्‍यांकडे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीवर नेण्यासाठी सहकार्य मागितले, परंतु कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं कळताच कोणीही समोर आलं नाही. बिकट परिस्थितीचा सामना करताना टिळकधारी इतर कोणताही उपाय पाहण्यास असमर्थ ठरले आणि त्यांनी बायकोचा मृतदेह सायकलवर ठेवून अखेर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले.

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

ते सायकलवर मृतदेह घेऊन गावातील नदीकाठी पोहोचले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून टिळकधारी सिंग यांना मदत केली. मृतदेहासाठी वाहन तयार केले आणि सामान पुरवले आणि मग गाडीची व्यवस्था केली आणि मृतदेह रामघाटाकडे पाठविला. इतकंच नाही तर अंत्यसंस्कारासाठी पैसेही दिले.

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

या संदर्भात सीओ माडियाहु संत कुमार यांनी सांगितले की, '' घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचताच. टिळकधारी सिंग यांना पोलिसांनी मदत केली. मृतदेहासाठी वाहनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. या व्यतिरिक्त शेवटच्या कार्यासाठी पार्थिव जैनपूरमधील रामघाट येथे पाठविण्यात आले.  पोलिसांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.''
 

Web Title: Uttarpradesh Body of the wife on the bicycle the police showed humanity performed the last rites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.