ट्रकला वेगाने येणाऱ्या रेल्वेने दिली जोरदार टक्कर, खतरनाक व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 12:56 IST2021-08-31T12:54:28+5:302021-08-31T12:56:32+5:30

मीडिया रिपोर्टनुसार, ही टक्कर रविवारी दुपारी झाली. यावेळी हायवे १८३ वर बनलेल्या रेल्वे ट्रॅकवरून एक ट्रक जात होता.

US : Train slamming into truck video goes viral | ट्रकला वेगाने येणाऱ्या रेल्वेने दिली जोरदार टक्कर, खतरनाक व्हिडीओ व्हायरल

ट्रकला वेगाने येणाऱ्या रेल्वेने दिली जोरदार टक्कर, खतरनाक व्हिडीओ व्हायरल

एका रेल्वेने जर एका ट्रकला टक्कर मारली तर काय होईल? असे अपघात अनेक सिनेमांमध्ये दाखवण्यात येतात. सोशल मीडियावर अशाच एका घटनेचे धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. ही घटना अमेरिकेच्या टेक्सासच्या सॅंट एंटोनियो येथील आहे. इथे एका रेल्वेने ट्रकला टक्कर मारली.

मीडिया रिपोर्टनुसार, ही टक्कर रविवारी दुपारी झाली. यावेळी हायवे १८३ वर बनलेल्या रेल्वे ट्रॅकवरून एक ट्रक जात होता. यादरम्यान मागून रेल्वे येत होती. रेल्वेचा स्पीड खूप जास्त होता आणि अशात रेल्वेने येऊन ट्रकला टक्कर दिली. या व्हिडीओत बघू शकता की, रेल्वे कशाप्रकारे वेगाने येत आहे आणि कशाप्रकारे रेल्वेने ट्रकला टक्कर दिली.

दुसऱ्या व्हिडीओत तुम्ही टक्करचा पुढचा भाग बघू शकता. ट्रकच्या मागे विंड टरबाइन ब्लेड ठेवले होते. रेल्वे त्यावर जाऊन भिडली. टक्कर इतकी जोरात होती की, टॅकने पलटी मारली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. 
 

Web Title: US : Train slamming into truck video goes viral