रोमँटीक मुड मध्ये सायकलवर होते काका-काकी, इतक्यात पाहिला कुत्रा अन् शेवट झाला असा की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 16:33 IST2021-08-27T16:32:29+5:302021-08-27T16:33:13+5:30
काहीवेळा कुत्र्यांनी काही केले नाही तरीही माणसं उगाच त्यांना घाबरतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यातील अंकल आणि आंटीची तारांबळ पाहुन तुम्ही पोट धरुन हसाल...

रोमँटीक मुड मध्ये सायकलवर होते काका-काकी, इतक्यात पाहिला कुत्रा अन् शेवट झाला असा की...
कुत्र्याला बघितलं की बऱ्याच जणांची भंबेरी उडते. मग कोणी कितीही हुशार, ताकदवान किंवा चपळ असला तरी. एकदा का कुत्रा मागे लागला की तुमचा त्याने चावा घेतलाच म्हणून समजा. मात्र काहीवेळा कुत्र्यांनी काही केले नाही तरीही माणसं उगाच त्यांना घाबरतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यातील अंकल आणि आंटीची तारांबळ पाहुन तुम्ही पोट धरुन हसाल...
व्हिडीओत पाहू शकता एक काका आपल्या बायकोला सायकलवर बसवून फिरायला निघाले आहेत. सुरुवातीला ते मस्त रोमँटिक अंदाजात आहे. अगदी हिरोसारखी अगदी स्लो मोशनमध्ये सायकल चालवतात. पुढे गेल्यानतंर त्यांना एक कुत्रा दिसतो. त्याला पाहताच काकांना घाम फुटतो. ते आपला सायकल चालवण्याचा वेग वाढवतात. सायकल अशी पळवतात अशी पळवतात की कुत्रासुद्धा मागे थांबून त्यांना पाहतच राहतो. काका भीतीने सायकल पुढे नेतात त्यांच्या मागे त्यांची बायको बसली आहे, याचंही कदाचित त्यांना भान राहत नाही. स्वतः पाण्यात पडू नये म्हणून ते पटकन कसाबसा तोल सावरत सायकलवरून उतरतात आणि बायकोसह सायकल पाण्यात पडते.
chutiyapa इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची नेटकरी भरपूर मजा घेत आहेत. अनेकांनी व्हिडिओ पाहुन अनेक मजेशीर कमेंट्स केले आहेत.