सॉफ्ट ड्रिंक हातात घेऊन कॅमेऱ्यासमोर देत होत्या पोझ, इतक्यात झाले असे की, चांगल्याच पडल्या तोंडघशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 14:02 IST2021-08-19T13:42:00+5:302021-08-19T14:02:49+5:30
सध्या तर दोन तरुणींचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींची व्हिडिओ शूट करत असताना चांगलीच फजिती उडाली आहे.

सॉफ्ट ड्रिंक हातात घेऊन कॅमेऱ्यासमोर देत होत्या पोझ, इतक्यात झाले असे की, चांगल्याच पडल्या तोंडघशी
सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओंमध्ये काही मजेदार गोष्टी दाखवलेल्या असतात की त्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सध्या तर दोन तरुणींचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींची व्हिडिओ शूट करत असताना चांगलीच फजिती उडाली आहे.
यामध्ये एका तरुणीच्या हातात सॉफ्ट ड्रिंक आहे. ती सॉफ्ट ड्रिंकचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करतेय. तर दुसरी एक तरुणी तिच्या बाजूला उभी राहून कॅमेऱ्याकडे पाहत वेगवेगळ्या पोज देत आहे. मात्र, याच वेळी एक मजेदार किस्सा घडला आहे. पहिली तरुणी झाकण उघडत असताना सॉफ्ट ड्रिंक थेट दुसऱ्या तरुणीच्या चेहऱ्यावर उडाले आहे. चेहऱ्यावर सॉफ्ट ड्रिंक उडताच दुसरी तरुणी चांगलीच गोंधळली आहे. तिच्या चेहऱ्यावर तसेच अंगावरसुद्धा सगळीकडे सॉफ्ट ड्रिंक उडालेले आहे.नंतर हा मजेदार किस्सा घडल्यानंतर दोन्ही तरुणी आनंदाने हसत आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सर्व गोष्टी अचानकपणे घडल्यामुळे या व्हिडीओची सगळीकडे चर्चा होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला शेअरसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर memezar या अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे.