कौतुकास्पद! दिव्यांग ग्राहकाला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलींनी भरवलं जेवणं, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 18:53 IST2020-11-20T18:42:17+5:302020-11-20T18:53:55+5:30

Viral News in Marathi : सोशल मीडियावर दोन मुलींच्या चांगुलपणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Two girl helps disabled man who was not able to eat girls helped him | कौतुकास्पद! दिव्यांग ग्राहकाला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलींनी भरवलं जेवणं, पाहा व्हिडीओ

कौतुकास्पद! दिव्यांग ग्राहकाला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलींनी भरवलं जेवणं, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर माणूसकीचे  दर्शन घडवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात अनेकदा असे प्रसंग खूप काही शिकवून जातात.  जर तुम्ही आयुष्यात कोणत्याही गरजवंताची मदत केली असेल तर समाधान काय असतं याचा प्रयत्य तुम्हाला आला असेल. सोशल मीडियावर दोन मुलींच्या चांगुलपणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका दिव्यांगाला या दोन मुली मिळून जेवण भरवत आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण हाताने या दोघी आपल्या या दिव्यांग माणसाला भरवत आहेत. 

रॅक्स चॅम्पमन या ट्विटर युजरने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.  या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, या दोन्ही मुली मिळून दिव्यांगाला  जेवण भरवण्यासाठी मदत करत आहेत.

आतापर्यंत या व्हिडीओला  १४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहले असून  ८८ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.   आतापर्यंत ९ हजारापेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. 

Web Title: Two girl helps disabled man who was not able to eat girls helped him