ही दोस्ती तुटायची नाय! कॅन्सरवरील उपचारानंतर भेटले दोन छोटे दोस्त, मारली एकमेकांना कडकडून मीठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 14:39 IST2021-08-18T14:38:25+5:302021-08-18T14:39:30+5:30
कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर एका ३ वर्षीय मुलाची त्याच्या मैत्रीणीला भेटण्याची एकमेव इच्छा होती. त्याची ती इच्छा पूर्ण झाली का? पाहा व्हिडिओत. हा व्हिडिओ फक्त कॅन्सरग्रस्तच नाही तर सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.

ही दोस्ती तुटायची नाय! कॅन्सरवरील उपचारानंतर भेटले दोन छोटे दोस्त, मारली एकमेकांना कडकडून मीठी
कॅन्सर (Cancer) या आजारात रुग्णाला अक्षरश: नरकयातना भोगाव्या लागतात. हा भयंकर आजार केवळ रुग्णालाच (Cancer Patient) नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबालाच पोखरतो. कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर एका ३ वर्षीय मुलाची त्याच्या मैत्रीणीला भेटण्याची एकमेव इच्छा होती. त्याची ती इच्छा पूर्ण झाली का? पाहा व्हिडिओत. हा व्हिडिओ फक्त कॅन्सरग्रस्तच नाही तर सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
एल्टिस आणि मॅक पोर्टर यांची भेट आपल्या कॅन्सरवरील उपचारादरम्यान रुग्णालयात झाली होती. अनेक आठवडे एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर ते पुन्हा एकदा रुग्णालयाच्या बाहेर भेटले आणि त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा इमोशनल व्हिडिओ मॅकी स्ट्रॉन्ग नावाच्या पेजवरुन इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
यात मॅक हातामध्ये फुलांचा गुच्छ घेऊ हळूहळू पॅसनकडे जाताना दिसतो. पॅसनही आनंदानं आपल्या मित्राच्या हातातील फुलं घेते आणि यानंतर दोघंही गळाभेट घेतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की यानंतर दोघंही डान्स करू लागतात. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला भरपूर लाईक मिळत आहे. सोबतच अनेकांनी कमेंट करत या दोघांचंही कौतुक केलं आहे.