Video: माकडांनाही आता 'चेंज' हवाय... दुकानातले केळीचे घड सोडून मसालेदार चिप्सवर मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:40 IST2025-12-03T17:39:01+5:302025-12-03T17:40:59+5:30
monkey viral video: माकडांचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Video: माकडांनाही आता 'चेंज' हवाय... दुकानातले केळीचे घड सोडून मसालेदार चिप्सवर मारला डल्ला
monkey viral video: सोशल मीडियावरमाकडांचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. माकडांना केळी किती आवडतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण असे दिसते की आजकाल ते वेगळ्याच गोष्टी करत आहेत. हल्ली माकडांना केळ्यांपेक्षाही मसालेदार आणि तिखट पदार्थ आवडू लागले आहेत असे दिसते आहेत. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक चतूर माकड चलाख चोरासारखा किराणा दुकानात घुसतो आणि नंतर तो जे करतो ते नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करणारे आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे माकड ज्या दुकानात चोरी करण्यासाठी आला होता, त्या दुकानाबाहेर केळीचे घड लटकलेले होते, पण माकडाने त्यांच्याकडे पाहिलेही नाही. माकड दुकानात घुसला आणि त्याने चिप्सचे पॅकेट चोरून धूम ठोकली. दुकानाबाहेर उभ्या असलेल्या एका माणसाने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली, जी आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ-
सोशल मीडियावर @fun_edit_z_ या अकाउंटवरून हा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी लाईक केला आहे. लोकांनी व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, माकडाने केळी न चोरता मसालेदार चिप्स चोरले. दुसऱ्याने लिहिले की, माकडे केळी नेहमीच खातो, आज त्याला वेगळं काहीतरी खायचं असणार! याचसारख्या अनेक कमेंट्स यावर दिसत आहेत.