Trending Viral Photo : Canadian member of parliament william amos appears naked during an official digital meeting | Viral Photo : बोंबला! ऑनलाईन मिटींगमध्ये कपडे न घालताच समोर आला खासदार; फोटो व्हायरल झाला अन् मग.....

Viral Photo : बोंबला! ऑनलाईन मिटींगमध्ये कपडे न घालताच समोर आला खासदार; फोटो व्हायरल झाला अन् मग.....

कॅनडाच्या एका खासदाराला लाजिरवाण्या प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. त्याला कारणही तसंच आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण कॅनडाचा हा नेता ऑनलाईन मिटिंग सुरू असताना कपडे न घालताच सगळ्यांच्या समोर आला आहे.  कोरोनाच्या माहामारीमुळे संसद भवन आणि  कॉमन्समधील सभासद डिजिटल मीटिंगदरम्यान एकत्र जमले होते. अशात एका सदस्याला नग्नावस्थेत पाहून सगळेचजण चकीत झाले. 

या खासदाराचे नाव विलियम अमोस आहे २०१५ मध्ये पोंटिएकच्या क्यूबिल जिल्ह्यात त्यांनी प्रतिनिधित्व केले होते.  आता त्यांचा एक स्क्रिनशॉट व्हायरल  होत आहे. ज्यात डेस्कच्या मागे  उभा असलेल्या या माणसाला कपडे न घालता उभं असल्याची जाणीव होते. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रायव्हेट पार्टला स्मार्टफोननं झाकण्याचा प्रयत्न केला आहे. एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!

या विचित्र प्रकारानंतर अमोस यांनी ट्विट करत घटनेबाबत माफी मागितली आहे.  दुर्भाग्यानं माझ्याकडून ही चूक झाल्याचं सांगितले आहे.  जॉगिंगवरून आल्यानंतर कपडे बदलताना माझा व्हिडीओ कॅमेरा ऑन  राहिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर हाऊस ऑफ कॉमन्सच्या आपल्या सहकाऱ्यांची माफी मागितली.  हा फोटो संसदेच्या एका सदस्यानं व्हायरल केल्याचं समोर आलं आहे. बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Trending Viral Photo : Canadian member of parliament william amos appears naked during an official digital meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.