VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:45 IST2025-10-03T16:45:03+5:302025-10-03T16:45:48+5:30
Small boy playing cricket viral video : प्रोफेशनल क्रिकेटपटूलाही लाजवेल अशी चिमुरड्याची तडाखेबाज फलंदाजी

VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
Small boy playing cricket viral video : गेल्या काही दिवसापासून क्रिकेट या खेळामुळे भारतात वातावरण तापले आहे. नुकतीच पार पडलेली आशिया चषक स्पर्धा भारताने जिंकली. पण पाकिस्तानी मंत्र्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियाने नकार दिला. त्यावरून गेला आठवडाभर वादविवाद आणि टीकाटिपण्णी सुरू आहे. तशातच क्रिकेटबाबत एक चांगली गोष्टही चर्चेत आली आहे. नुकताच सोशल मीडियावर एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्याने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. रस्त्यावर खेळणाऱ्या या लहानग्याच्या फलंदाजीचे तंत्र आणि शॉट सिलेक्शन पाहून मोठ्या क्रिकेटपटूंनाही नक्कीच त्याचा हेवा वाटेल.
व्हिडिओमध्ये दिसणारा हा छोटा मुलगा अवघ्या साडेतीन वर्षांचा आहे. पण इतक्या कमी वयातही तो अगदी प्रशिक्षित क्रिकेटपटूप्रमाणे फलंदाजी करताना दिसत आहे. त्याचा फलंदाजीला स्टान्स उत्तम आहे. तसेच तो प्रत्येक चेंडूवर योग्य फूटवर्क करतानाही दिसतो. त्याने मारलेले कव्हर ड्राइव्ह आणि स्ट्रेट ड्राइव्हचे फटके हे परफेक्ट टायमिंगचे उत्तम उदाहरण आहे. चेंडू बॅटच्या 'स्वीट स्पॉट'वर लागल्यामुळे तो वेगाने दूर जातानाही स्पष्टपणे दिसतो. पाहा व्हिडीओ-
------------------
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा @cricketkingdebark या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. एवढ्या लहान वयात खेळाची अचूक समज आणि तंत्रशुद्ध खेळ पाहून क्रिकेटप्रेमीही चकित झाले आहेत. अनेकांनी या 'लिटल मास्टर'ला भविष्यातील क्रिकेट स्टार म्हणून संबोधले आहे. दरम्यान, तो मुलगा कोण आहे, तो कुठे कोचिंग घेतो की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण त्याचा व्हिडीओ मात्र नक्कीच व्हायरल झाला आहे.