Video: सिंहीणीने सिंहाला मारली एक 'फाईट', पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:56 IST2025-11-19T12:55:36+5:302025-11-19T12:56:08+5:30
lion lioness viral video: सिंह आणि सिंहीणीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय

Video: सिंहीणीने सिंहाला मारली एक 'फाईट', पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
lion lioness viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ वन्यप्राण्यांचेही असतात. अशा व्हिडीओंना आजकाल खूप पसंती मिळताना दिसते. नवरा-बायकोचे मजेशीर व्हिडीओ तर नेहमीच पाहायला मिळतात. पण सध्या सिंह आणि सिंहीणीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यातील सिंहाची अवस्था पाहून तुम्हालाही हसू येईल.
जंगलातील मजेदार व्हिडिओ
हा व्हिडिओ एका जंगलातील आहे. एक सिंह उभा असतो. सिंहीण शेजारी आरामात बसलेली दिसते. अचानक सिंहाचा लहानसा छावा सिंहासमोर हट्ट करताना दिसतो. त्याचा खोडसाळपणा सुरू असतानाच सिंह त्याच्यावर गुरगुरतो नि त्याला हळूच एक फटका मारतो. ते पाहून सिंहीण चिडते आणि सिंहाला जोरात फटका मारते. त्यानंतर सिंह गप्पपणे मान खाली बसतो. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायक होत असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ जंगलात शूट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. काहींच्या म्हणण्यानुसार, हा AI व्हिडीओही असू शकतो. पण या व्हिडिओमधील सिंहाची अवस्था पाहून सारेच हसताना दिसत आहेत.