अशी सफाई कोण करतं... बंगल्याची साफसफाई करणाऱ्या महिलेचा VIDEO पाहून नेटकरी चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:26 IST2025-11-25T12:22:50+5:302025-11-25T12:26:01+5:30
lady cleaning home video: एक छोटीशी चूक झाल्यास दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती दिसते

अशी सफाई कोण करतं... बंगल्याची साफसफाई करणाऱ्या महिलेचा VIDEO पाहून नेटकरी चक्रावले
lady cleaning home video: हल्लीच्या जीवनात सोशल मीडिया लोकांच्या दैनंदिन वापराचा भाग बनला आहे. सोशल मीडियावर वेळ घालवणे हा हल्ली लोकांचा आवडता टाईमपास झाला आहे. पण याच सोशल मीडियावर काही वेळा असे काही व्हिडीओ व्हायरल होतात की सारेच अवाक् होतात. काही वेळा लोक व्हिडीओ पाहून पोट धरू हसतात तर काही वेळा भावनिकही झाल्याचे दिसतात. सध्या एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साफसफाई करणाऱ्या महिलेची जोरदार चर्चा रंगली आहे.
व्हिडिओमध्ये एक महिला घराची साफसफाई करताना दिसते. सुरुवातीला सगळं काही सामान्य वाटते. पण पुढच्याच क्षणी महिला अचानक घराच्या बाल्कनीत जाते आणि इमारतीची बाहेरून साफसफाई करण्यास सुरूवात करते. ती दोन्ही हातांनी ग्रिलला धरून बाहेर पडते. इतक्या उंचीवर उभे राहून साफसफाई करणे किती जोखमीचे आणि धोकादायक असू शकते याची साऱ्यांनाच कल्पना आहे. एक छोटीशी चूक झाल्यास दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती असते. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होतोय. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याने वर लिहिले आहे की सफाई थांबू नये.. या व्हिडीओला लोकांनी अनेक लाइक्स दिले आहेत. त्याचसोबत अनेकांनी या व्हिडीओ कमेंट्स केल्या आहेत. आपला जीव धोक्यात घालून अशी साफसफाई केल्याबद्दल अनेकांनी त्या महिलेवर टीका केली आहे. तर काहींनी या महिलेच्या कामाप्रति असलेल्या समर्पणाची स्तुती केली आहे.