VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 16:29 IST2025-10-23T16:28:41+5:302025-10-23T16:29:18+5:30
india girl traditional lehenga london: या पारंपरिक पोशाखाला लंडनच्या लोकांकडून काय प्रतिक्रिया मिळाली, हे तिने या व्हिडीओत दाखवले

VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
india girl traditional lehenga london: लंडनमधील लोक सामान्यतः मॉडर्न कपड्यात वावरताना दिसतात. तिथे राहणारे भारतीय लोकदेखील फार क्वचितच पारंपारिक पोशाखात दिसतात. हल्ली विदेशात साडी प्रेम दिसून येते. पण ती नेसण्याची पद्धत पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी असते. त्यात मॉडर्न पद्धतीचा अधिक शिरकाव असतो. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात वृतिका पारेख नावाची एक मुलगी भारतीय लेहंगा-चोली घालून लंडनच्या रस्त्यावर चालताना दिसते. तिच्या या पोशाखाला लंडनच्या लोकांकडून काय प्रतिक्रिया मिळते हे तिने या व्हिडीओत दाखवले आहे.
लेहंगा चोली व्हिडीओ व्हायरल
व्हिडिओमध्ये दिसते की, मुलगी पारंपारिक भारतीय लेहंगा चोली घालून खूपच आकर्षक दिसते. तिच्या कपाळावर एक छोटी बिंदी, कानात छान इअररिंग्स आणि हातात बांगड्या तिच्या सौंदर्यात भर घालतात. शिवाय, तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आत्मविश्वास साऱ्यांचेच लक्ष वेधून घेते. अनेक परदेशी लोक तिचे कौतुक करताना दिसतात. लंडनच्या रस्त्यांवर चालताना या मुलीची सगळेच वाहवा करतात. लोकांच्या प्रतिक्रियांवरून हे स्पष्ट दिसते की, परदेशी लोकांनाही भारतीय पोशाख खूप आवडतो. पाहा व्हायरल व्हिडीओ-
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर vritika.parekh नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. सुमारे २ लाख लोकांनी व्हिडिओला लाईकदेखील केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.