VIDEO: बापरे... पुराच्या पाण्यात दिसला महाभयानक साप, थायलंडच्या लोकांमध्ये प्रचंड घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:41 IST2025-11-27T16:40:44+5:302025-11-27T16:41:14+5:30
Thailand Flood Snake Viral Video: सध्या दक्षिण थायलंडमध्ये पुरामुळे सारंकाही उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे

VIDEO: बापरे... पुराच्या पाण्यात दिसला महाभयानक साप, थायलंडच्या लोकांमध्ये प्रचंड घबराट
Snake in thailand flood viral video: थायलंडच्या दक्षिण भागात सध्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. तशातच आता, पुराच्या पाण्यासोबतच इंटरनेटवर एका वेगळ्याच दहशतीने थैमान घातले आहे. पुराच्या या पाण्यात एक महाकाय साप पोहताना पाहिल्याने पूरग्रस्त नागरिकांमध्ये प्रचंड घबराट परसली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. हा व्हायरल व्हिडिओ इतका भयानक आहे की तो पाहून कोणाच्या अंगावर काटा येईल.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये एक महाकाय साप कमरेएवढ्या पुराच्या पाण्यात पोहताना दिसतोय. पूरपरिस्थित तो सापदेखील सुरक्षित आश्रय शोधत असल्याचेच चित्र आहे. पण नागरिकांसाठी मात्र हा प्रकार धक्कादायक आहे. स्थानिकांचा असा दावा आहे की, वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे अशाप्रकारचा महाकाय साप त्याच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर आला आहे. जेव्हा लोकांनी त्याला सापाला रस्त्यावर तरंगताना पाहिले, तेव्हा साऱ्यांचीच त्रेधातिरपिट उडाल्याचे दिसून आले. पाहा व्हिडीओ-
น้ำท่วมก็หนักหนาแล้ว ยังมาเจองูตัวเบ้อเริ่ม ไม่รู้ว่าจงอาจหรือเปล่า!?#น้ำท่วมหาดใหญ่pic.twitter.com/ll5vj0LPST
— joe black (@joe_black317) November 25, 2025
या व्हिडिओवर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट केलीये की, आधी पूर आणि आता महाकाय साप यामुळे तेथील सामन्यांचे आयुष्य बिकट होत चाललंय, थायलंडवासीयांसाठी प्रार्थना करा.
दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार पुराचा सर्वाधिक फटका हात याई आणि सोंगखला या भागात बसला आहे. तिथे सततच्या मुसळधार पावसामुळे रस्ते, घरे आणि बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. हजारो लोक छतांवर अडकले आहेत. बचाव पथके बोटी आणि ट्रक वापरून अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत, ते पाहून पुराच्या भयानक परिस्थितीचे वास्तव स्पष्ट होत आहे.