Bihar boy Singing: दिल दे दिया है... इंटरनेटवर VIRAL झाला तरूणाचा VIDEO, अभिनेत्रीने थेट मागितला मोबाईल नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 14:01 IST2023-02-22T13:59:30+5:302023-02-22T14:01:01+5:30

या तरूणाचा आवाज इतका सुरेल आहे की तुम्हीही त्याचे फॅन व्हाल.

trending bihar boy amarjeet jaikar singing viral video dil de diya hai song internet bollywood actress asks for phone number | Bihar boy Singing: दिल दे दिया है... इंटरनेटवर VIRAL झाला तरूणाचा VIDEO, अभिनेत्रीने थेट मागितला मोबाईल नंबर

Bihar boy Singing: दिल दे दिया है... इंटरनेटवर VIRAL झाला तरूणाचा VIDEO, अभिनेत्रीने थेट मागितला मोबाईल नंबर

Bihar boy Singing Viral Video: सध्याचं युग हे इंटरनेट आणि सोशल मीडियाचं युग आहे. त्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यात घडत असलेली गोष्ट इंटरनेटच्या स्पीडपेक्षाही जास्त वेगाने जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचते. सोशल मीडिया हा एक असा मंच आहे जिथे कोणत्याही प्रकारच्या गोष्टींना मज्जाव केला जात नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक गोष्टी झपाट्याने व्हायरल होत असतात आणि त्याचा साऱ्यांना आनंद घेता येतो. इंटरनेटच्या कृपेने कधी काय व्हायरल होईल आणि कधी कोणत्या बाबींना प्रसिद्धी मिळेल याचा अंदाज बांधणे तसे कठीण आहे. पण अनेकदा या सोशल मीडियाच्या माध्यमातून कानाकोपऱ्यात लपलेले टॅलेंट म्हणजे एखाद्याची प्रतिभा नक्कीच प्रकाशझोतात येते. सध्याही तशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

भारतात प्रतिभेची कमतरता नाही. प्रतिभावान लोक फक्त एक संधी शोधत असतात. आता सोशल मीडिया त्यांना ही संधी देत ​​आहे. लाखो लोक दररोज त्यांचे व्हिडिओ Instagram, YouTube, Twitter वर अपलोड करत असतात. त्यातच आता बिहारचा एक तरूणाची एक गाण्याची क्लिप इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये अमरजीत शेतात गाणे म्हणत आहे. त्याच्या हातात टूथब्रश आहे आणि दोन मुले आजूबाजूला आहेत. असे दिसते की दात घासताना त्याने फक्त गाणे गायले आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि इंटरनेटवर शेअर केला. पाहा व्हिडीओ-

या क्लिपमध्ये गाणारा मुलगा आहे अमरजीत जयकर. तो २००४ मध्ये आलेल्या 'मस्ती' चित्रपटातील 'दिल दे दिया है' हे हिट गाणे गाताना दिसत आहे. त्याचा आवाज इतका अप्रतिम आहे की तुम्हीही त्याचे नक्कीच चाहते व्हाल. याचंच एक उदाहरण म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्री नीतू चंद्रा श्रीवास्तव हिने २१ फेब्रुवारीला तिचा व्हिडिओ शेअर केला आणि ट्विटरवर लिहिले की- "हा मुलगा कोण आहे? अप्रतिम. कृपया याचा नंबर माझ्याशी शेअर करा. मला नंबर पाठवा."

Web Title: trending bihar boy amarjeet jaikar singing viral video dil de diya hai song internet bollywood actress asks for phone number