अन् तो तिच्यासाठी देवदूतासारखा धावुन आला! प्रसंगावधनाने वाचवले चिमुकलीचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 12:10 IST2022-06-14T11:52:32+5:302022-06-14T12:10:46+5:30
सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे त्याची शौर्यकथा लोकांपर्यंत पोहोचते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अन् तो तिच्यासाठी देवदूतासारखा धावुन आला! प्रसंगावधनाने वाचवले चिमुकलीचे प्राण
सोशल मिडिया हे असे प्रभावी माध्यम आहे जिथे एखाद्याच्या कार्याचा नक्कीच गौरव होतो. लोक स्वत:हुन अशा व्यक्तीचे कौतुक करतात. त्यात एखाद्याने जर शौर्याचे कार्य केले तर निश्चितच तो लोकांच्या कौतुकास पात्र ठरतो. खरंतर सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे त्याची शौर्यकथा लोकांपर्यंत पोहोचते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
ट्रैफ़िक पुलिस के जवान सुंदर लाल.🙏 pic.twitter.com/ulmX48a5ki
— Awanish Sharan (@AwanishSharan) June 12, 2022
अविनाश शरण यांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट करण्यात आला आहे. यात भरधाव वेगाने एक बस येते आहे. तितक्यात एक रिक्षा त्या बसच्याच रस्त्यावरुन टर्न घेत आहे. इतक्यात त्या रिक्षातील चिमुकली खाली पडते. सर्वांच्यात काळजाचा ठोका चूकतो. पण धावत आलेला ट्रॅफिक पोलीस एखाद्या देवदुताप्रमाणे धावत येतो अन् त्या बसला थांबण्यासाठी हात दाखवत चिमुकलीला उचलतो. त्या पोलिसाच्या प्रसंगावधनामुळे त्या चिमुकलीचा प्राण वाचतो. त्याचवेळी तिथुन तिची आई धावत येते अन् मुलीला स्वत:च्या जवळ घेते.
हा व्हिडिओ पाहुन तुमचं काळीज नक्कीत हेलावलं असेल. तो पाहताना तुमचा थरकापही झाला असेल. पण तुम्ही ट्रॅफिक पोलिसाच्या शौर्याला सलाम करायला विसरणार नाही. फक्त १६ सेकंदाच्या व्हिडिओला आतापर्यंत ११ लाख व्हिव्ज मिळाले आहेत. नेटकरी या फोटोवर कमेंट करत ट्रॅफिक पोलिसाचं कौतुक करत आहेत.