शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
2
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
3
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
4
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
5
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
6
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
7
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
8
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
9
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
10
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
11
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
12
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
13
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
14
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
15
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
16
Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
17
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
18
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
19
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
20
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:35 IST

Sleeper Vande Bharat Express Train: पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत प्रवाशांमध्ये कमालीची उत्सुकता असून, भारतीय रेल्वेच्या एका अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत आली आहे.

Sleeper Vande Bharat Express Train: १७ जानेवारी २०२६ हा दिवस भारतीय रेल्वेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. चेअर कार स्वरुपातील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन लोकप्रियतेच्या शिखरावर असताना भारतीय रेल्वे आता स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत प्रवाशांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशातच रेल्वेच्या एका अधिकाऱ्याची एक्सवरील पोस्ट चर्चेत आली आहे. 

१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज

काही दिवसांपूर्वी स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत कधी येईल, याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती. दोन प्रोटोटाइप रेक, अनेक महिन्यांची ट्रायल, या दरम्यान आलेल्या अडचणी, निरीक्षणांनंतर केलेले महत्त्वाचे बदल असे अनेक टप्पे पार करत अखेरीस वंदे भारत ट्रेन स्लीपर व्हर्जन भारतीय रुळांवर धावताना दिसणार आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात सामान्य प्रवाशांसाठी आतापर्यंत देण्यात आल्या नाहीत, अशा अनेक सोयी, सुविधा स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये पाहायला, अनुभवायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच

रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत, नेमके काय म्हणतायेत?

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पणाआधी एक्सवर एक पोस्ट केली आहे. “कृपया जर तुम्ही ‘टॉयलेट मॅनर्स’ शिकलेले असाल, तसेच वॉशरूमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणार असाल, आणि तुम्हाला सार्वजनिक मालमत्तेबाबत आदर असेल तरच या ट्रेनने प्रवास करा. धन्यवाद!” अशी पोस्ट करण्यात आली आहे. त्यांची ही पोस्ट ८५ हजांरहून अधिक लोकांना पाहिली असून, यामुळे रेल्वेमधील स्वच्छतेचा स्तर आणि ठेवली जाणारी देखरेख याबाबत लोक भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

युझरचे भाष्य आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा रिप्लाय

अशी आशा आहे की फ्लश नीट काम करेल, पाणी भरलेले असेल, टिश्यू ठेवलेले असतील. कृपया त्यानंतरच लोकांना याबद्दल शिक्षित करा, कारण बहुतेकदा २ एसी आणि ३ एसीमध्ये हे उपलब्ध नसते. योग्य देखभाल आवश्यक आहे, पुरेसे कर्मचारी असले पाहिजेत, आणि कंत्राटदारांनी लूट करू नये, असे एका युजरने त्यांच्या पोस्टवर म्हटले आहे. यावर, किमान प्रीमियर रेल्वेमध्ये तरी ही समस्या कधीच नसते. फक्त एवढी समस्या आहे की, काही पॅसेंजर फ्लश करण्याचे किंवा तो चालतोय की नाही हे पाहण्याचेही कष्ट घेत नाहीत, असा रिप्लाय अधिकाऱ्यांनी दिला. दुसरीकडे एका युजरने रेल्वे कर्मचारी कचरा रेल्वेमधून बाहेर फेकतानाचा व्हिडीओ शेअर केला. यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की, काही जुने निवडक व्हिडिओ पसरवल्याने पूर्ण सत्य समोर येत नाही. हो, ही एक समस्या आहे आणि ती सोडवली जात आहे. असे प्रकार करत असलेल्या व्हेंडर्सकडून मोठा दंड आकारला जात आहे.

दरम्यान, वंदे भारत स्लीपरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये RAC किंवा वेटिंग लिस्ट तिकीट असणार नाही. प्रवाशांना केवळ 'कन्फर्म' तिकीटच दिले जाईल. रेल्वेने स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी किमान ४०० किमी अंतराचे भाडे निश्चित केले आहे. या ट्रेनचे तिकीट दर अंतरावर आधारित असून GST स्वतंत्र असणार आहे. वंदे भारत स्लीपरमध्ये ४०० किमी पर्यंतच्या प्रवासासाठी, थर्ड एसीचे भाडे ₹९६०, सेकंड एसीचे भाडे ₹१२४० आणि फर्स्ट एसीचे भाडे ₹१५२० असेल. त्याचप्रमाणे, ८०० किमी पर्यंतच्या प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹१९२०, २एसीचे भाडे ₹२४८० आणि १एसीचे भाडे ₹३०४० असेल. १६०० किमीच्या प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹३८४०, २एसीचे भाडे ₹४९६० आणि १एसीचे भाडे ₹६०८० असेल.  २००० किमीच्या प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹४८००, २एसीचे भाडे ₹६२०० आणि फर्स्ट एसीचे भाडे ₹७६०० असेल. त्याचप्रमाणे, २८०० किमी प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹६७२०, २एसीचे भाडे ₹८६८० आणि पहिल्या एसीचे भाडे १०६४० असेल. ३५०० किमी प्रवासासाठी, ३एसीचे भाडे ₹८४००, दुसऱ्या एसीचे भाडे ₹१०८५० आणि पहिल्या एसीचे भाडे ₹१३३०० असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Sleeper Vande Bharat: Travel only if you have toilet manners, says official.

Web Summary : Ahead of the Sleeper Vande Bharat launch, a railway official's post on toilet etiquette went viral. He urged passengers to maintain cleanliness. The train offers confirmed tickets and charges based on distance.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसTravel Tipsट्रॅव्हल टिप्सSocial Viralसोशल व्हायरलTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडियाrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpassengerप्रवासीticketतिकिटIndian Railwayभारतीय रेल्वे