याला म्हणतात 'Rich by heart'! पापड विकणाऱ्या चिमुकल्याला एकानं ₹500 दिले, उत्तर ऐकूण स्तब्ध व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:05 IST2025-01-25T17:04:26+5:302025-01-25T17:05:11+5:30

कधीकधी काही व्हिडिओ असेही असतात, जे आपल्याला प्रचंड हसवतात. काही व्हिडिओ असेही असतात, जे आपल्याला खूप काही शिकवून जातात. तर काही व्हिडिओ असेही असतात, जे आपल्या डोळ्यात टचकन पाणी आणतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल.

This is called 'Rich by heart' A man gave rs 500 to a child selling papad, you will be shocked to hear the answer | याला म्हणतात 'Rich by heart'! पापड विकणाऱ्या चिमुकल्याला एकानं ₹500 दिले, उत्तर ऐकूण स्तब्ध व्हाल!

याला म्हणतात 'Rich by heart'! पापड विकणाऱ्या चिमुकल्याला एकानं ₹500 दिले, उत्तर ऐकूण स्तब्ध व्हाल!

सोशल मीडियावर सातत्याने वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी काही व्हिडिओ असेही असतात, जे आपल्याला प्रचंड हसवतात. काही व्हिडिओ असेही असतात, जे आपल्याला खूप काही शिकवून जातात. तर काही व्हिडिओ असेही असतात, जे आपल्या डोळ्यात टचकन पाणी आणतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल. जो तुम्हालाही काहीतरी शिकवून जाईल. 

चिमुकला म्हणाला, 'काम करतो, भीख नाही मांगत' -
या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक चिमुकला पापड घेऊन समुद्रकिनाऱ्यावर बसला आहे. तो संबंधित इंफ्ल्युएन्सरला म्हणतो, 'दादा, पापड विकले जात नाहीये.' यावर इंफ्ल्युएन्सर त्याला एक पापड ५ रुपयांना मागतो. यावर तो चिमुकला मुलगा त्याल म्हणतो, 'दादा, तो ५ रुपयांना नाहीये.' यावर, इंफ्ल्युएन्सर विचारतो, 'आईवर प्रेम करतोस?' मुलगा म्हणतो, 'हो करतो', मग पुन्हा इंफ्ल्युएन्सर म्हणतो, 'मीही माझ्या आईवर प्रेम करतो, माझी आई तुझी आई नाही का?' हे ऐकूण संबंधित चिमुकला 30 रुपयांचा पापड 5 रुपयांना देतो.  

...हे ऐकूण इन्फ्ल्युएन्सरही थक्क होतो -
यानंतर पुन्हा इंफ्ल्युएन्सर येतो आणि संबंधित पापड मिकणाऱ्या मुलाला म्हणतो, 'माझ्या आईला पापड आवडला.' यावर तो चिमिकल्याला 500 रुपये देऊ लागतो. मात्र, तो चिमुकला ते घेण्यास नकार देतो आणि म्हणतो, 'दाद, मी एवढे पैसै घेऊ शकत नाही. जेवढ्याचा पापड आहे तेवढेच घेईन.' यावर इंफ्ल्युएन्सर म्हणतो, 'अरे तू माझ्या आईसाठी पापड दिले, हे माझ्याकडून तुझ्या आईसाठी राहू दे.' यावर संबंधित चिमुकला म्हणतो, 'दादा, काम करू शकतो, भीक मागत नाही. तर दुसऱ्यांचे पैसे कशासाठी घेऊ.' हे ऐकूण इन्फ्ल्युएन्सरही थक्क होतो. 


आतापर्यंत १० लाखहून अधिक लोकांनी बघितलाय व्हिडिओ - 
हा व्हिडिओ @younickviraltrust या नावाच्या इस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्या आला असून, सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. जो आतापर्यंत १० लाखहून अधिक लोकांनी बघितला आहे. लोक या चिमुकल्याचे कौतुक करत आहेत. 

Web Title: This is called 'Rich by heart' A man gave rs 500 to a child selling papad, you will be shocked to hear the answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.