पोलिसांसमोरच छोट्याश्या खिडकितून आत गेला चोरटा, याचे स्किल बघुन तुम्ही तोंडात बोटे घालाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 16:45 IST2021-12-10T16:44:59+5:302021-12-10T16:45:13+5:30

आम्ही तुम्हाला असा एक चोर दाखवणार आहोत ज्याचे कौशल्य बघुन पोलिसही अवाक् झाले. तुम्ही कल्पनाही करु शकत नाही इतक्या कौशल्याचे काम त्याने केले आहे.

thief crossing small window as police orders will make you amaze video goes viral | पोलिसांसमोरच छोट्याश्या खिडकितून आत गेला चोरटा, याचे स्किल बघुन तुम्ही तोंडात बोटे घालाल

पोलिसांसमोरच छोट्याश्या खिडकितून आत गेला चोरटा, याचे स्किल बघुन तुम्ही तोंडात बोटे घालाल

चोरी करणे हा गुन्हाच आहे. पण ते एकाप्रकारे फार कौशल्याचे काम आहे. आम्ही तुम्हाला असा एक चोर दाखवणार आहोत ज्याचे कौशल्य बघुन पोलिसही अवाक् झाले. तुम्ही कल्पनाही करु शकत नाही इतक्या कौशल्याचे काम त्याने केले आहे.

व्हिडिओमध्ये एका चोराला पोलिसांनी पकडून घरासमोर नेले आहे. त्या घराची खिडकी अगदी लहान आहे. जी पाहून कोणीही त्यातून पलिकडे जाऊ शकेल, अशी कल्पनाच कुणी करु शकत नाही. पण, जेव्हा पोलिसांनी त्या चोराला या खिडकीतून जाण्यास सांगितलं, तेव्हा तो हे काम अगदी सहजतेने करताना दिसला.

खिडकीतून आत जाण्यासाठी चोर प्रथम त्याचे दोन्ही पाय खिडकीच्या आत घालतो. त्यानंतर त्याच्या शरीराचा खालचा भाग खिडकीच्या त्या बाजूला सरकवतो. मग हळू हळू तो प्रयत्न करत राहतो. पहिल्या नजरेत बघून हा माणूस खिडकीच्या आतही जाऊ शकतो हे त्याच्या लक्षात येत नाही, पण शेवटी तो एका छोट्या खिडकीतून त्याच्या संपूर्ण शरीरात बाहेर काढतो

चोरट्याचा हा कारनामा पाहून सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘भाऊ, चोरांकडे सर्व काही करण्याचे अप्रतिम तंत्र असतं.’ व्हिडिओवर कमेंट करताना दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘केवळ एक एक्सपर्टच ही पद्धत वापरु शकतो. याशिवाय अनेक यूजर्सने या व्हिडिओवर कमेंट्सद्वारे त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

@DRGulati80 नावाच्या अकाऊंटद्वारे हा आश्चर्यकारक व्हिडिओ मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले, ‘पोलिसांना खात्री नव्हती की हा माणूस या खिडकीतून कसा बाहेर पडेल.. मग चोराने डेमो दाखवला. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत.

 

Web Title: thief crossing small window as police orders will make you amaze video goes viral