दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 12:21 IST2024-05-25T12:18:36+5:302024-05-25T12:21:11+5:30
अनोख्या चोरीच्या घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
सोशल मीडियाच्या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. कोणी एकाने व्हिडीओ अथवा फोटो कैद केल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जगभर पोहोचत असतो. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यातील चोरी पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बाईकवर स्वार झालेले तीन चोरटे एका चालत्या ट्रकमधून सामान चोरताना दिसत आहेत. मात्र, विशेष बाब म्हणजे या चोरीच्या घटनेत ट्रक चालकाचा देखील हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ट्रक संथ गतीने पुढे जात असताना चोरट्यांनी मालाची चोरी सुरू ठेवली. चोरीची घटना पूर्ण झाल्यानंतर ट्रक चालकाने आपल्या वाहनाची बाजू बदलून तो पुढे निघून गेला. ही घटना आता चर्चेचा विषय बनली आहे. ही चोरी ट्रक चालकाच्या संमतीने झाली का, असा प्रश्न लोकांना पडत आहे. ट्रक चालक चोरांचा साथीदार आहे का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
... म्हणून ट्रक चालकावर संशय
संबंधित ट्रकला आरसे असताना देखील चालकाला काहीच कसे कळले नाही असा प्रश्न नेटकरी करत आहेत. तर, ट्रक चालकाने चोरट्यांना सहकार्य करत चोरी करण्यासाठी मदत केली असल्याचेही काहींनी म्हटले आहे. चोरी पूर्ण होईपर्यंत आणि तिघेही चोरटे खाली उतरेपर्यंत ट्रक एकदम कडेच्या लेनने जात होता. पण, चोरीची घटना पूर्ण झाल्यानंतर चालकाने लेन बदलल्याने संशय बळावला आहे. या घटनेमुळे सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण केला जात आहे.
ये वीडियो आगरा-मुंबई नेशनल हाईवे पर मध्यप्रदेश में शाजापुर जिले की है। बाइक सवार 3 चोर चलते ट्रक से सामान चुरा रहे हैं। हालांकि इस घटना में ऐसा भी लगता है, जैसे ट्रक ड्राइवर की मिलीभगत हो। चोरी होने तक ट्रक साइड चलता रहा। चोरी पूरी होते ही ट्रक की साइड बदल गई... pic.twitter.com/FfhIZHpJps
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) May 25, 2024
तसेच तीन चोरट्यांनी चालत्या ट्रकमध्ये चोरी केल्याने अनेकांना धक्का बसला. चालू ट्रकमध्ये धाडस दाखवत ते चोरटे खाली उतरले. त्यांचा एक साथीदार मागून एका मोटारसायकलवर येत असल्याचे दिसते. विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी आपले काम पूर्ण झाल्यानंतर चालू गाडीतून खाली उतरण्याची भलतीच किमया साधली. खरे तरे ते चोरटे ट्रकमधून उतरले आणि धावत्या मोटारसायकलवर स्वार झाले. या अनोख्या चोरीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.